आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील अनेक दिवसापासून जिल्हात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या असून त्याचे पीक पावसाच्या पाण्यात सापडलेले आहे. पावसामुळे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणी करीता युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो नागरिकाच्या उपस्थितीत देवळी येथे लोटांगण आंदोलन केले. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.
प्रमुख मागण्या..
संपुर्ण वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
गेल्या वर्षीचा १००% पीक विमा व नुकसान भरपाई त्वरित द्यावी.
वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे तातडीने निकाली काढावे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
सर्व पांदण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे.
पिकविमा सरसकट लागू करावा.
सिबील स्कोरची अट रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्जाचे वाटप करावे.
यासह आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून देवळी तहसील कार्यालयावर लोटांगण घालून धडक देण्यात येणार आहे. दि. ऑगस्ट रोज गुरुवारला बस स्टँड चौक देवळी येथे दु. ठिक १:०० वाजता मोठया संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थितीत युवा समितीचे अध्यक्ष श्री किरण ठाकरे यांच्या देवडीत लोटांगण आंदोलन संपन्न झाले.