प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.10:- आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी 7.30 वाजता 2 किमी अंतराच्या मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव गणेश खताळे यांच्या हस्ते मॅरेथॅानला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसिलदार संदिप पुंडेकर, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी, बाळुताई भागवत, शिक्षणाधिकारी नितू गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांची उपस्थिती होती.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकाटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी व मदत करण्यासाठी युवकांची महत्वाची भूमिका असते. युवकांमध्ये एकतेची भावना निर्माण होऊन संकट काळाचा सामना कशा प्रकारे करावा यासाठी मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन आले असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
या मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेसह मान्यवर अधिकारी उपस्थित होते. यशवंत महाविद्यालय, जमनलाल बजाज विज्ञान महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, न्यु.इग्लीश ज्यु. कॉलेज व जवान डिफेन्स ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक आलेल्या अनुक्रमे मुला- मुलींना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.