सकारात्मक आश्वासन मिळाल्याने महिलांचे आंदोलन स्थगित.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात मंजूर झालेले ४३० बेडचे बांधकाम त्वरित सुरू करावे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची स्थळ निश्चिती लवकरात लवकर करावी,या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे ४३० बेडचे बांधकाम मंजूर झाले असल्याने तसेच बांधकाम मंजूरी होऊनही बराच कालावधी लोटला असूनही येथे कोणतेही काम सुरू करण्यात आले नाही.
याशिवाय हिंगणघाट येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थळ निश्चिती प्रक्रिये संदर्भात दिरंगाई होतांना दिसत आहे. या संदर्भात शहरांतील कृतिशील महिलांच्या “सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट”व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीला कृती समितीच्या वतीने शासनाला वारंवार निवेदन देऊन सदर बांधकाम काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु उपरोक्त कामाला विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलांकडून स्थगित केलेले धरणे आंदोलन पुन्हा ७ जुलै,२४ रविवार पासून सुरू करण्यात आले. भरपावसात सुद्धा महिलांच्या या सवित्रीच्या लेकी व शासकिय वैद्यकिय महविद्यालय कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरूच ठेवले असल्याने याची दखल घेत काल दि.११ रोज रविवारला आ. समिर कुणावार यांनी या आंदोलनाला भेट दिली.
उपजिल्हा रुग्णालय प्रांगणातील मंजूर झालेले ४३० बेडचे बांधकाम महिन्याभरात सुरू होईल, सदर कामाकरीता या पूर्वीचं निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी दिली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थळ निश्चितीसाठी पाच विविध जागेंचा प्रस्ताव राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे पाठविण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील जागा, नांदगाव, कोल्ही, कुटकी व जाम अश्या पाच जागांचा समावेश असल्याचे सांगीतले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे अशी महिलांकडून मागणी करण्यात आली. या सोबतच स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील शासनाचे ठरवून दिलेल्या पुरेपूर सुविधांची मागणीसुद्धा महिलांनी केली, यात कायमस्वरूपी (पात्र) कर्मचारी, परिपूर्ण औषधीव्यवस्था, सुसंगत वैद्यकीय उपकरनांचा पुरवठा, नियमित स्वच्छता प्रबंध अशा महत्त्वाच्या बाबींकडे आमदार महोदयांनी स्वतः प्रकर्षाने लक्ष देऊन सर्व मुद्यांवर कार्यवाही करण्याची मागणी सावित्रिच्या लेकिंकडून करण्यात आली. चर्चेअंती सर्व मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आ.कुणावार यांनी दिल्या नंतर महिलांनी आपले धरणे आंदोलन स्थगित केले.
आश्वासनात दिलेल्या कालावधी मध्ये काम सुरू करण्यात आले नाही तर हे स्थगित धरणे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असे महिलांनी सांगितले. यावेळी सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शासकिय वैद्यकिय महविद्यालय कृती समितीच्या अध्यक्षा सीमा मेश्राम, सचिव राजश्री बांबोळे, रुपेश लाजुरकर, निर्मला भोंगाडे, सिंधू दखणे, मोनाली फुलझेले, रूपा सोरदे, योजना वासेकर, नंदिनी मांडवे, वंदना थुल, श्रुतू कांबळे, रजनी कांबळे, वंदना भगत, पूजा वानखेडे, वैशाली वासेकर, रीना नगराले, प्रतिभा इंदुरकर, जयश्री देवगडे, स्नेहा गेडाम, मीरा फुलमाळी, सुजाता कांबळे, प्रमिला कुंभारे, संगीता लभाने, सुकेशिनी ढोरे, मंजू खानपुरे, श्रद्धा वंजारी, अमिता ढवळे, वंदना महेंद्र भगत, रेखा नाईक, श्वेता वानखेडे इत्यादी सखी उपस्थित होत्या.