मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगगनघाट:- मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बद्दल लोकप्रतिनिधी लोकांना निर्भयपणे दिशाभूल करत होते तसेच खोटे आश्वासन देऊन लोकांची हिंगणघाट येथेच कॉलेज आणि अशी फसवणूक करत होते. शेवटी गव्हा येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आपला व्यवसाय शेती करणाऱ्या मुलानी याविरुद्ध आवाज उठवला. या सर्व कारभार पाहून संभ्रमित होत टाकीवर चढून आंदोलन केले आणि हिंगणघाट येथेच वैद्यकीय महाविद्यालय होईल अशी पूर्ण शहरात आशेची लाट पेटवली.
काल याच संदर्भात सावित्रीच्या लेकी यांनी मागणी केली होती की जर हिंगणघाटचे कॉलेज दुसऱ्या तहसीलमध्ये गेले तर आमचा आंदोलन सुरूच राहणार असा अट्टाहास त्यांनी आमदाराच्या भेटीमध्ये २४९ व्या दिवशी केला होता. त्याचबरोबर महिला संघर्ष समितीच्या महिलांनी लगेच आपले फसवणूक होत आहे आणि जामची जागा निश्चित केली जात आहे हे कळताच जिल्हाधिकारी कार्यालयात काल धाव घेतली आणि तसेच जिल्हाधिकारी याना घेराव करण्याच्या दिशेने त्या सरसावल्या होत्या पण वेळेवर त्यांना जिल्हाधिकारी न मिळाल्यामुळे फक्त निवेदन देत परत आल्या.
त्यातच आणखी एक भर म्हणजे आज कैलास मेश्राम या गव्हाकोल्ही या गावच्या एका शेतकऱ्याच्या मुलाने नूतन ग्राउंड लगतच्या येथील पाण्याच्या टाकीवर चढत आपले आंदोलन केले. त्याचे म्हणणे एवढेच आहे की जर कॉलेज हिंगणघाट येथे मान्य झाले आहे तर तहसील समुद्रपूर मध्ये कसे काय ते प्रस्थापित केले गेले आणि वेळेवरती जाम जागा कशी दाखवली गेली हाच त्याचा एक अट्टाहास होता. स्वतः आणि या मागणीने त्याने पूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास तो टाकीवर चढला. तिथून पोलीस प्रशासन आणि इतर लोकांच्या जमाव सुरू झाला. नारे बाजी सुरू झाली आणि लोकांच्या भावना पेटून उठल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या पार्टीचे कार्यकर्ते, संघर्ष समितीचे लोक महिला यांनी नारेबाजी सुरू केली आणि त्याला प्रतिसाद मिळाला आंदोलनाला एक पाऊल पुढे नेले. शेवटी नायाब तहसीलदार आणि इतर अधिकारी वर्ग येऊन हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी वर्ग येऊन विनवणी करत होते की, तुम्ही प्रशासन आणि सुव्यवस्था अस्ताव्यस्त करण्यापेक्षा खाली या, तेव्हा त्यांनी हे सर्व माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्येच होईल असे आश्वासन घेऊन त्याने उतरण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आंदोलनाला स्थगिती देत नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी हिंगणघाट तहसीलदार यांच्याशी पण चर्चा करण्यात आली. त्यामध्ये लोकांनी आपले मत ठेवले, कॉलेज जर हिंगणघाटला झाले नाही तर हिंगणघाट येथील शांतता आणि सुव्यवस्था चिघळेल. त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन हिंगणघाट येथेच महाविद्यालय होईल अशाच विचार करण्याची आवश्यकता आहे. असा इशारा दिला. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी असे सांगितले की हिंगणघाट हे उग्र स्वरूपाचे आंदोलनात्मक गाव आहे त्यामुळे या गावच्या लोकांच्या भावनांशी खेळून या लोकांचे अन्याय होऊ नये. बऱ्याच वर्षात आलेली एक सुवर्णसंधी या गावाला रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा या गावाच्या लोकांनाच करून देण्यात यावा असा आग्रह नागरिकांनी धरला.
यावेळी आंदोलन स्थळी माजी आमदार राजू तीमांडे, चेतन वाघमारे, कैलास मेश्राम, रागिणी शेंडे, सुजाता जीवनकर, सुजाता जांभुळकर, सुनिता तामगाडगे, मीनाक्षी ढाकणे, चंदा येलेकर, पिंकी रंगारी, संदेश मुन, सुनील पिंपळकर, सुरेंद्र बोरकर, संजय निखाडे आणि इतर लोक उपस्थित होते.