अमृत कलश यातत्रेत महिला बचत गट व शाळेचे विद्यार्थ्यांच्या सहभाग होणार रॅलीत.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नगर परिषद राजुरा द्वारा स्वच्छता पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी महाराष्ट्र शासन यांचे पत्र दिनांक 5 /9 /2023 अन्वये दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान साजरे करणे बाबत निर्देश दिले आहेत, या अभियानाचा एक भाग म्हणून इंडियन स्वच्छता लीग 2.0 चा दुसरा हंगाम व सफाई मित्र यांच्या करिता सेवा व सुरक्षा शिबिराचे आयोजन, सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप आरोग्याच्या कामातील सुरक्षात्मक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम व हैदराबादच्या निजामी राजवटीतून मराठवाडा विभाग दिनांक 17 सप्टेंबर 1948 ला मुक्त झाला महाराष्ट्र शासनातर्फे या दिवसाच्या स्मृती भावी पिढीला ज्ञान व्हाव्यात म्हणूनच आणि मेरी माटी मेरा देश चे अमृत कलस यात्रा चे आयोजन नगर परिषद राजुराच्या प्रांगणातून सकाळी ठीक 8,30 वाजता करण्यात आले.
यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने संविधान चौक, अहिल्याबाई होळकर चौक, उईके चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक, होत परत नगर परिषद राजुरा येथे रॅलीची सांगता होणार आहे, तरी राजुरा शहरातील नागरिक विद्यार्थी युवा वर्ग यांनी अमृत कलश यात्रा रॅलीत सहभागी होऊन राजुरा शहर, स्वच्छ राजुरा सुंदर राजुरा करण्याकरिता आणि राजुरा शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावे व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉक्टर सुरज जाधव मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद राजुरा यांनी केले आहे.