Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावास निमित्त धम्मदेशना संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 14, 2024
in धर्म, सांगली
0 0
0
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावास निमित्त धम्मदेशना संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावास पावन पर्वच्या अनुषंगाने रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्रावस्ती विहारात सकाळी 10.00 वाजता वर्षावास निम्मित प्रा. अशोक भटकर सर यांची धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात सर्व बौद्ध उपासक/ उपसिका, सभासद, संचालक, कार्यकारी सल्लागार मंडळ उपस्थित होते.

सर्वप्रथम करूनेचे महासागर महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, तसेच सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वरत्न बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धूप दीप पुष्प ने अभिवादन करून प्रमुख वक्ते आयुष्यमान भटकर सर यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस .आर. माने सर यांनी केले. त्यानंतर बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्न अनुसरून वंदना पठण करण्यात आले.

त्यानंतर संस्थेचे संचालक सी.बी. चौधरी यांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म पान क्रमांक 402 खंड क्रमांक पाच मध्ये गृहस्थासाठी विनय सियालवाद सूत्त असे स्पष्ट नमूद आहे त्याचप्रमाणे पाली भाषेतील शब्दकोशात सिगाल म्हणजे कोल्हा असे नमूद आहे. त्यामुळे सिगाल या शब्दात ऐवजी सीयाल सुत्त हेच योग्य आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती भटकर सर यांना केली केली. आपली कोणतीही श्रीमंत अथवा अत्यंत जवळची मोठी व्यक्ती आहे आणि धम्माचे नावाने अधम्म कर्म जर ती करीत असेल तर तर्क आणि अन्वेषण तर्कबुद्धी चा वापर करून त्याचे सखोल असे निरीक्षण करून मगच सहकार्य व मदत करणे ही काळाची गरज पडली आहे. याबाबत आपण सतर्क आणि विचारपूर्वक राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच बाबत विनंती केली की, जर आपण विचार न करता वर करणी बळी पडलो तर आपला मोडस ऑपेरेंडी म्हणून उपयोग होईल. त्या पासून सर्व संचालक सभासद उपसिका/ उपासक यांनी सजग /सावध असावे अशी आदरपूर्वक विनंती करून आपले मनोगत व्यक्त केली.

शांती, संयम, राग, लोभ, द्वेष, मत्सर बाबत चांगले मार्गदर्शन भटकर सर यांनी केल्याबद्दल भटकर सरांचे आभार मानले. बौद्धांची पवित्र स्थळे आणि त्यांना भेटी देणे आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती भटकर सर यांनी सांगण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे पिंपळाच्या झाडाखाली स्वस्तिक या गरीब गुराखी यांनी दान दिलेले कुस गवत दान केले त्या गवतापासून भगवंतांनि याचे साडे सात फुट लांब, आणि साडे 4 फूट 10″ रुंद ,आणि उंच तीन फूट असे आसन तयार करून सात आठवडे पुरेल इतके अन्न घेऊन सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसले. सदर झाडाखाली त्यांना संबोधी प्राप्त झाली. म्हणून त्याला बोधी वृक्ष म्हटले जाते. म्हणून बुद्ध धम्मा मध्ये बोधी वृक्षाला अत्यंत पवित्र असे मानले जाते. त्यामुळे आपल्या घरा जवळ अथवा सभोवती बोधी वृक्ष, तसेच विहाराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. विहारात आल्यानंतर बोधी वृक्षाला प्रथम वंदन भंतेजी महाथेरो डॉक्टर यश काशपायन करतात. त्यानंतर भगवान बुद्धांना बोधी वंदना घेऊन वंदन करतात. हा आदर्श आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. या वृक्षाची तोड कोण करणार नाही याची खबरदारी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे.

आपले पूर्वज तुळस दारात लावत असत. तथागतांच्या काळात भंते आनंद यांनी श्रावस्ती येथे बोधी वृक्ष लावला त्याला आनंद बोधी वृक्ष म्हणतात. त्याची फांदी महेंद्र आणि संघमित्रा यांनी श्रीलंका येथील अनुराधा पुरम येथे बोधी वृक्षाची फांदी लावली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय परिसर आणि नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात बोधी वृक्षाचे रोपण केले आहे. यावरून बोधी वृक्ष किती पवित्र आहे हे आपल्या लक्षात येईल.

अलीकडे विदर्भातील काही बौद्ध कुटुंब आपल्या घराच्या दारासमोर कुंडीमध्ये बोधी वृक्षाचे रोपण करून त्याचे पूजन करीत आहेत असे आढळून येते. बोधी वृक्ष दारात लावणे आणि त्याची पूजा करणे आवश्यक आहे. विदर्भामध्ये ही प्रथा परंपरा सुरू आहे. हिंदू संस्कृतीने बोधी वृक्षाला मुद्दाम अशुभ मानले आहे ही चुकीची आणि खोडसाळ प्रवृत्ती आहे. भगवान बुद्धांनी पवित्र स्थळांच्या बाबती महापरी निबान सुत्ता मध्ये भगवान बुद्ध आणि आनंद यांचा संवाद नमूद आहे. त्यामध्ये बुद्ध सांगतात की, मी माझ्या महापरिनिर्वाणानंतर बौद्धनी चार पवित्र स्थळांना भेटी देणे आवश्यक आहे, जो कोणी प्रसन्न आणि आनंद चित्ताने या श्याक्य चैत्याना स्थळांना जन्मस्थळ लुंबिनी, बोधी प्राप्ती बौद्ध गया, प्रथम प्रवचन सारनाथ आणि महापरिनिर्वाण कुशीनगर या ठिकाणी भेटी देतील त्यांना सुगती प्राप्त होईल. देव गती प्राप्त होईल. भंनतेजी यांनी त्याबाबतचे महत्त्व पौर्णिमेस सांगितलेले आहे आपण सर्व मानव असून या मानवाने जर पंचशीलाचे पालन काया वाचा मनाने केले तर तो मानव मनुष्य होतो. माणसानने माणसाशी वागणे हा मानवाचा खरा धर्म आहे. मनुष्य माणसासारखे वागत नसेल तर त्याला पशुचा दर्जा सुद्धा देणे चुकीचे आहे. कारण पशु सुद्धा चांगले काय वाईट काय हे समजून उमजून राहत असतो. पंचशीलाचे आचरण करणे खूप अवघड आहे. जो मनुष्य पंचशीलाचे काया वाचा आणि मनाने काटेकोरपणे आचरण करतो तो मनुष्य होय, आणि पुढे अष्ट शीला चे पालन केल्याने देव होतो. बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये विशुद्धीचा मार्ग त्यामध्ये सविस्तर आपणाला माहिती नमूद केलेली आहे. जो मनुष्य दहा परमिता पूर्ण करतो, तो बोधिसत्व होय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व म्हटलेले आहे. कारण त्यांनी पंचशील अष्टशील तसेच दहा शीलाचे काटेकरपणे पालन केल्याने ही उपाधी मिळाली आहे. 10 पारमिता पूर्ण केलेल्या आहेत.

आपणास 14 ऑक्टोबर 1956 रोजी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या पाच प्रतिज्ञा आहेत, त्यातील ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले आहे. जेव्हा डॉ. बाबासाहेब 20 नोव्हेंबर 1956 ला लुंबिनी येथील जन्मस्थळ आणि सम्राट अशोक यांनी बांधलेल्या स्तंभाला खाली वाकून वंदन केले स्थळाला भेट दिली आणि आणि मिठी मारून ढसाढसा रडले सुद्धा आहेत. त्यानंतर ते काठमांडूला गेले त्यामुळे आपण सुद्धा अशा पवित्र स्थळांना भेटी देणे आवश्यक आहे. असे महत्व सांगितलेले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पांढऱ्या स्वच्छ कपड्यांमध्ये प्रत्येक रविवारी दहा ते अकरा या वेळेत विहारात जाऊन बोधी वृक्ष आणि भगवान बुद्ध यांना प्रथम पंचांग प्रणाम करणे धम्म प्रचार आवश्यक आहे असे आपणास आदेश दिलेले आहेत. याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे खंड क्रमांक 18 भाग तीन यामध्ये आपणास वाचावयास मिळतील . त्यानंतर विमानाने कुसीनगर या ठिकाणी चंद्रमणी महाथेरो त्यांचे धर्मगुरू यांची भेट घेऊन तीन दिवस त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. एक डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये भरलेल्या सोहळ्यास उपस्थित राहून बुद्ध मूर्तीचे निरीक्षण केले. दोन डिसेंबर 1956 रोजी बुद्धगया येथे होणाऱ्या 2500 बुद्ध महापरिनिर्वाण सोहळ्या मध्ये दलाई लामाच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या दिल्लीच्या सभेमध्ये सुद्धा ते उपस्थित होते आणि या सभेमध्ये दलाई लामा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बोधिसत्व म्हणून उल्लेख करून सन्मान आणि गौरव केला आहे. पाच डिसेंबर 1956 च्या दोन जैन मुनिच्या समवेत चर्चा झाली आणि त्यांना 6 डिसेंबर चे निमंत्रण सुद्धा दिले बाबासाहेब म्हणाले माझी जर तब्येत ठीक असेल तर मी त्यास नक्की उपस्थित राहीन. आणि 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या बौद्ध आणि जैन धर्माबाबत चर्चा या कार्यक्रमाची पत्रिका ही तयार केली होती. जर 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले नसते तर जैन धर्माचे मुनी सुद्धा बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केले असते. आपण बौद्धांनी आता पवित्र स्थळांना भेटी देणे आवश्यक आहे.

या सर्वांना जरी भेटी देता आल्या नाही तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले मार्गदाता आहेत ते आधुनिक बुद्ध आहेत, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व असल्याने त्यांचे जन्मस्थळ शिक्षण स्थळ, अंबावडे गाव, सातारा येथे शिक्षण घेतले ते स्थळ, माता भिमाई समाधी स्थळ, सातारा येथे आहे तसेच सातारा येथे बाबासाहेब शिक्षण घेत होते त्या शाळेला प्रवेश घेतला ते स्थळ, जन्मस्थळ महू, 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा दिली ते दीक्षाभूमी स्थळ, महापरिनिर्वाण अंत्यसंस्कार स्थळ चैत्यभूमी इत्यादी स्थळांना सुद्धा आपण श्रद्धापूर्वक भेटी देणे आवश्यक आहे. या प्रेरणास्थळांना सुद्धा भेटी द्याव्यात आणि आपणास नक्कीच आयुष्याचे चीज होईल हे सांगितले. विहाराच्या माध्यमातून या सहली आयोजित करावे असे आव्हानही त्यांनी संयोजकाला आणि संचालक मंडळास केले .

आयुष्यमान चौधरी साहेब यांनी सियाल सुत्ता बाबत स्पष्टीकरण करणे बाबत विनंती केल्यानुसार बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सीयाल सुत्त सुद्धा बौद्धांची आचार संहिता आहे. भगवान बुद्ध हे राजगीर मधील वेळूवनात मध्ये राहत होते. राजगीर यास पूर्वीचे नाव पाटलीपुत्र हे सुद्धा होते. राजगीरच्या डोंगरावर जपान सरकारने शांती स्तूप बांधलेला आहे. त्या ठिकाणी देवदत्त यांनी भगवान बुद्धाला ठार मारण्यासाठी मोठा दगड ढकललेला होता ,दगड भगवंताच्या पायाच्या अंगठ्याला आणि करंगळीला लागला आणि रक्त निघाले तो गृदकृत पर्वत होय. त्या ठिकाणी पहिली धम्म संगती सप्तपर्णी गुहा येथे झालेली आहे .त्यावेळी अजातशत्रू हा राजा होता ,तो देवदत्ताच्या बाजूने होता आणि भगवान बुद्धांचा द्वेष करीत होता. देवदाताचे ऐकून त्याने वजी जे राज्य होते त्यामध्ये दोन ग्रुप पाडले होते वजी दोन ग्रुपचा नायक हा देवदत्त होता. अकुशल कर्म कसे होते त्याचे उदाहरण त्यांनी दिले आहे. नालागिरी हत्तीला दारू पाजून महाकारूणीक भगवान बुद्ध यांच्या अंगावर हत्या करण्यासाठी सोडण्यात आले होते तसेच राजा बिंबिसार याचा वध करून राज्य बळकावले होते. परंतु देवदत्ताचे अकुशल कर्म लक्षात आल्यानंतर राजा आजातशत्रू यांनी यांनी भगवान बुद्धाचे शिष्यत्व पत्करले. आणि वजी ग्रुप दोनचा नायक देवदत्त व त्याच्या संघाला त्यांनी मगध राज्यातून हाकलून हद्दपार केले. हे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्म पुस्तकात असल्याबाबत सांगितले.

त्यामुळे अकुशल कर्म करू नये, एकजुटीने राहावे वजी ग्रुप एक जसा एकजूट होता त्याप्रमाणे आपल्या विहारांमध्ये सुद्धा एकजूट ठेवावी अशी विनंती आणि अहवान केले. वेळूनामध्ये एक सदग्रहस्थ भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी येत असे ,त्याचा मुलगा सियाल यांनी सुद्धा प्रवचन ऐकावे अशी त्याची खूप इच्छा होती पण तो येत नसे तो तरुण होता तो ते नेहमी त्याला सांगायचे पण तो त्यांचे ऐकत नसे, तो शेवटपर्यंत गेला नाही. त्याचे वडील आजारी पडले आणि त्यांनी मुलाला सांगितले की माझ्या मृत्यूनंतर चारी दिशाचे दर्शन घ्यावे. असे मुलाकडून वचन घेतले. आणि त्यांचे निधन झाल्यानंतर वडिलांना दिलेल्या वचनानुसार सियाल नावाचा मुलगा हा नेहमी नदीवर जाऊन आंघोळ करून चारी दिशांचे दर्शन घेत असे .त्यानुसार तथागत आणि सियाल यांची भेट झाल्यानंतर भगवंतांनी त्याला विचारले हे आर्य पत्र तू काय करीत आहेस त्यावर त्यांनी भगवंतांना सांगितले की हे भगवंत माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे व त्यांना दिलेल्या वचनानुसार मी चारी दिशांना वंदन करून त्याचे पालन करीत आहे.त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की, या चारी दिशांचा अर्थ तुला माहित आहे का? त्यांनी सांगितले की, मला याबाबत काही माहिती नाही. कृपया आपण मला सांगावे, भगवान बुद्ध म्हणाले पूर्व दिशा ही माता पित्याची आणि उगवत्या सूर्याची दिशा आहे येते भौगोलिक दिशा मानवाच्या नसून आणि पूर्वेकडे जेव्हा तो नमस्कार करतोस तेव्हा तू आई-वडिलांना वंदन करीत असतोस. पाच प्रकारची पूजा भगवान बुद्धांनी सांगितली आहे. आई- वडिलांच्या आज्ञेत राहणे, आई वडील सांगतील ते काम करणे, आई-वडिलांची सेवा सुश्रुषा करणे, त्यांचे संगोपन करणे, आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करणे दानधर्म करणे, ते केल्यावर त्याचे लाभ सुद्धा खूप चांगले सांगितले आहेत. आणि हे कुशल कर्म आहे. त्यामुळे चांगला उद्योग उत्कर्ष होतो. चांगली नोकरी मिळते, जे मुलं आई-वडिलांचे ऐकतात त्यांचे कल्याण होते आणि जे ऐकत नाही ते दुर्गती पदाला जातात. पश्चिम दिशां म्हणजे पाठीराखीची दिशा सहचारिणी पत्नी मुलांची दिशा. ती आपल्या घराकडे मुला बाळाकडे लक्ष देते. तुम्ही जर तिला मान दिला तर तुम्हाला सुद्धा मानसन्मान देते तुमच्या धनदौलतीचे संपत्तीचे रक्षण करते. मंगल परिणाच्या वेळी आपण प्रतिज्ञा घेतो मी माझ्या पत्नीचा सन्मान करेन, मी तिला सन्मानाने वागवीन ,तिचा अवमान करणार नाही. तिला धनदौलतीने संतुष्ट ठेवीन .मिथ्याच्यार व्याभिचार करणार नाही, ह्या प्रतिज्ञा भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म खंड क्रमांक पाच भाग क्रमांक 5 विनय सियाल सुता मध्ये नमूद आहेत. जर आपल्या पत्नीचा मानसन्मान केला तर आपलं घर किती उत्कृष्ट आणि चांगलं राहतं हे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. उत्तर दिशा ही आपल्या नातेवाईकांची दिशा, मित्रमंडळीची दिशा, त्याचा लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे होत असतो .त्याच्यानंतर दक्षिण दिशाही आपल्या गुरुची दिशा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे गुरु आंबेडकर ग्रंथालय मध्ये भेटावयास आले त्यावेळी त्यांना उभे राहून वंदन करून पान सुपारी एक धोतरजोडी आणि सव्वा रुपया दान दिले होते. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या गुरूंना नतमस्तक झालेले होते. आणि वरची आकाशाची जी दिशा आहे ती आपल्या पूजनीय लोकांची आहे जे भंतेजी असतील, श्रमण असतील, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्री संत रोहिदास इत्यादी ची दिशा आहे. आणि खालची दिशा म्हणजे सेवकांची आहे. त्यांनाही आपण मानसन्मान देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे प्रत्येक देशाची पाच प्रकारे पूजा केल्याने पाच प्रकारे लाभ होतात असे भगवंतानी या तरुण मुलास सांगितले आहे त्यांनी ते मान्य केले आणि भगवंताची शिष्यत्व स्वीकारले. आपण सर्वांनी पण असाच संकल्प करावा आणि एकजुटीने राहावे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा.

शेवटी सरानी सुमारे एक तास पंधरा मिनिटे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आभार मानून धम्मदेशनेला पूर्णविराम दिला. त्यानंतर डॉक्टर सुधीर कोलप यांनी सर्व बौद्ध उपासक उपसिका, संचालक माता, बंधू, भगिनी यांनी पिन ड्रॉप सायलेन्स राखून धम्मदेशना ऐकून घेतली त्याबद्दल आभार मानले. त्याचप्रमाणे अगदी वेळेवर म्हणजे दहा ते अकरा या वेळेत कार्यक्रम सुरू झाला आणि उपस्थिती अत्यंत समाधानकारक होती त्याबद्दलही आनंद व्यक्त करून आभार मानले. तसेच भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणेबाबत विनंती केली तसेच त्याच दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये डॉक्टर यश काशपायन महाथेरो भंतेजी हे वर्षावास पावन पर्व सुरू असल्याने त्या निमित्त धम्मदेशना देणार आहेत सर्वांनी उपस्थित राहणेबाबत विनंती केली.

Tags: बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासवर्षावास
Previous Post

आदित्य कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्र व जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बीडच्या विद्यार्थ्यांची SBI बँकेमध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड.

Next Post

नगरपरिषद राजुरा द्वारा स्वच्छता पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नगरपरिषद राजुरा द्वारा स्वच्छता पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ.

नगरपरिषद राजुरा द्वारा स्वच्छता पंधरवाडा अभियानाचा शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In