संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजूरा 19 ऑगस्ट:- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र स्तरावर चार वयोगटात बालचीत्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केंद्रस्तरीय बालचीत्रकला स्पर्धा नगर परिषद केंद्र राजुरा मधून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने घवघवीत यश संपादन करून गट क्रमांक एक मधे विष्णू अलिप विश्वास याने पहिला क्रमांक, गट क्रमांक दोन मधे प्रगती किशोर पेटकर हिचा पहिला क्रमांक तर गट तिसरा मधे प्राप्ती नेताजी पावडे द्वितीय क्रमांक, गट क्रमांक चार मधे चैतन्य संतोष कवलकर याचा तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या सर्व विद्यार्थ्याच्या यशाबद्दल मनोज गौरकर गट शिक्षणाधीकारी पंचायत समिती राजुरा, बंडू ताजणे केंद्रप्रमुख नगर पालिका राजुरा, शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, रुपेश चिडे, जयश्री धोटे, अर्चना मारोटकर, रजनी पिदूरकर, प्राजक्ता साळवे, वैशाली चिमुरकर, लोढे, रणदिवे आदी शिक्षकांनी क्रमांकप्राप्त विध्यार्थीचे अभिनंदन केले आहे.