अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या असंघटित व स्थलांतरीत कामगारांना अन्न नागरी पुरवठा विभाग तहसिल कार्यालय हिंगणघाट तर्फे आवाहन करण्यात आले आहे की, ज्या कामगारांकडे अद्यापही राशन कार्ड नाही. त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून नविन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर करावा.
तहसिल कार्यालय हिंगणघाट तर्फे यावेळी सांगण्यात आले की, केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे परंतू त्यांचेकडे अद्यापही राशन कार्ड नाही अशा स्थलांतरीत / असंघटित कामगारांना नविन शिधापत्रिका देण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तरी ज्या कामगारांकडे अद्यापही राशन कार्ड नाही त्यांनी तहसिल कार्यालय हिंगणघाट येथे नविन राशन कार्ड करीता अर्ज करून आपली शिधापत्रिका प्राप्त करावी. असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे करण्यात येत आहे.

