राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिट व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा वृक्ष रक्षाबंधन संयुक्त उपक्रम. जोगापूर वन पर्यटन क्षेत्रातील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 20 ऑगस्ट:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील इको क्लब व स्काऊट्स – गाईड्स युनिट, आदर्श हायस्कुल राजुरा राष्ट्रीय हरित सेना विभाग आणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्य चांदा वनविभाग वनोद्यान, निसर्ग निर्वाचन केंद्र राजुरा येथे वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. संजय धोटे, माजी आमदार, राजुरा यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून पवन कुमार जोंग, उपविभागीय वनाधिकारी, वनविभाग राजुरा यांची तर प्रमुख अतिथी म्हणून एस. डी. येलकेवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे.),अरुण मस्की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्करराव येसेकर, सुनील मेश्राम, वनपाल सामाजिक वनिकरण , अनंत डोंगे, तालुका अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,संतोष देरकर, सह सचिव नागपूर विभाग, नेफडो, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, मत्ते, गज्जलवार, जयश्री धोटे, इको क्लब प्रमुख, रुपेश चिडे,स्काऊट मास्तर, विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी ऍड. संजय धोटे यांनी आपल्या बालपणातील आठवणी सांगत मुलांना पर्यावरणाचे महत्व सांगितले. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्वाचे स्थान् असून बालवयापासुनच आपण पर्यावरण संवर्धणाची सवय करून घेतली पाहिजेत असे प्रतिपादन धोटे यांनी केले. पवन कुमार जोंग यांनी निसर्गातील अन्न साखळी व त्यातील प्रत्येक घटक कसा एकमेकांवर अवलंबून असतो याविषयी माहिती देत राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थीनी पर्यावरण योद्धा म्हणून आपल्या परिसरात कार्य केले पाहिजेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयश्री धोटे यांनी केले तर प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. जोगापूर वन पर्यटन क्षेत्रातील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात यावेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिटच्या विध्यार्थीनी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक यांनी अथक परिश्रम घेतले.