उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने वर्षावासाच्या अनुषंगाने आषाढ महिन्यातील आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सात ते नऊ या वर्षावासाच्या तिसाव्या दिवशी श्रावण पौर्णिमेनिमित्त विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप ,सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालिका उषाताई कांबळे तसेच कालकतीथ नितीन सरोदे यांचे पत्नीसह सर्व कुटुंबीय भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सुहास धोत्रे इत्यादीच्या उपस्थितीत करुणेचे महासागर महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न याची धूप दीप पुष्प यांनी वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे एस .आर.माने सर यांनी प्रास्ताविक केले, भारतीय बौद्ध महासभेचे यांनी नितीन सरोदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विहाराचे सदस्य चंद्रकांत नागवंशी सर यांनी महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनामध्ये श्रावण पौर्णिमेला घडलेल्या घटनांचा थोडक्यात आशय सांगितला .त्यामध्ये प्रमुख घटना म्हणजे ज्या दिवशी दरोडेखोर आणि हिंसक डाकू अंगुलीमालास दीक्षा देण्यात आली तो दिवस श्रावण पौर्णिमा इसवी सन पूर्व 504 चा बौद्ध जगतात मानण्यात येतो .त्यातील अग्रश्रावक म्हणजे अंगुलीमाल होय. त्याने हिसा सोडून अंगुलीमाल हा अहिंसेच्या मार्गी लागला .दुसरी घटना म्हणजे महाकारूणीक भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्याने पहिली धम्म संगीति राजगृह येथे भरवण्यात आली या प्रथम धम्म संगतीचे अध्यक्ष महाकश्यप होते. ही धम्मसंगीती श्रावण पौर्णिमा इसवी सन पूर्व 483 रोजी सुरू झाली व ती पुढे सात महिने चालली आणि त्रिपिटक तयार झाले त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या विशुद्धीच्या मार्गाप्रमाणे आचरण केल्यानंतर सुखी जीवनाचा मार्ग संपन्न होतो असे सांगितले.
त्यानंतर विहाराचे संचालक सी.बी. चौधरी यांनी सर्व संस्कार अनित्य आहेत. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा निसर्गाचा नियम आहे . “अनिच्यावत संकारा उपादवय धमिनो” या सुताने धम्मदेशना देण्यास सुरुवात केली. निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की, पहिली गोष्ट निघून जाते. जसे की, पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते. हवा आली की उष्णता निघून जाते. प्रकाशाला की अंधार निघून जातो. तसे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. त्रिपीटकामध्ये धम्मपद हा ग्रंथ आहे. जीवनातील प्रत्येक विषयावर अडचणीवर मार्ग सांगणारा ग्रंथ आहे.
धम्म म्हणजे मन( चित्त व चेतसिका) याला धम्म म्हणतात. या मनाच्या विविध स्वभावाचे एकत्रिकरण म्हणजे धम्मपद होय. धम्मपद त्रिपिटक साहित्यातील सुत्त पीटकाच्या खुदक निकाय मधील एकूण 19 ग्रंथापैकी एक प्रमुख ग्रंथ आहे. धम्मपदामध्ये एकूण 26 वर्ग आहेत .या वगात एकूण 423 धम्मपद गाथा आहेत. आणि ३०५ कथा आहेत. धम्मपद सामाजिक राजकीय शैक्षणिक बाबीसह अनेक पैलू आहेत. त्यावर मार्गदर्शन केले आहे. यामध्ये विद्यार्थी, गृहस्थ, भिक्षू ,भिक्षणी त्यांच्यासाठी अशा विविध बाबीवर मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे धम्मपद याचे वाचन करून जीवनामध्ये आचरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच नागवंशी सरांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे सांगितल्यामुळे मला आता पुढील घटनांचा आढावा सांगणे सोपे झाले आहे. या दोन घटना व्यतिरिक्त पुढील घटना त्यांनी श्रावण पौर्णिमेच्या विषद केल्या. आषाढ पौर्णिमेपासून व वर्षावास पर्व सुरू झाले असून श्रावण पौर्णिमेपर्यंत एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.
विहारांमध्ये वर्षावास कार्यक्रम कार्यकारी मंडळ चांगल्या प्रकारे घेत असून बरेच उपासक-उपासिका माता बंधू भगिनी त्याचा लाभ घेत आहेत, तसेच पाली भाषेमध्ये परित सूत्त आचरण उपासक उपासिका अमलात आणत आहेत. याबद्दलही त्यांना धन्यवाद देऊन आभार मानले. त्याचप्रमाणे याबाबत संस्थेच्या सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले . इसवीसन पूर्व 527 श्रावण पौर्णिमेच्या काशीचे शेठ यांनी त्यांचे चार सोबती आणि 50 गावातील ग्रामवासी यांनी धम्माची दीक्षा घेतली होती तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होय. याच पौर्णिमे दिवशी अनाथपिंडक सुदत्त या शेठने धम्म सुताचे कथन केलेले आहे. तसेच श्रावण पौर्णिमेची महत्त्वाची घटना म्हणजे आताचे बिहार राज्यातील राजगीर व तत्कालीन राजगृह येथे पहिली धम्म संगती सप्तपर्णी गुफा येथे इसवी सन पूर्व 504 रोजी राजा आजातशत्रूच्या कालावधी झालेली आहे. राजा अजातशत्रुने महाकारूणी भगवान बुद्ध यांच्याकडून बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ही धम्म संगती भरविलेली होती. या धम्म संगती मध्ये पाचशे भिखुनी भाग घेतलेला होता. याचे अध्यक्ष पद महाकश्यप यांनी भूषवलेले होते. अरहंत झालेले उपली भंते यांनी यांची विनयपिटक ,सुत्त पीटक ,आणि अधिधम्मपीटक, हे संकलित करून त्रिपिटक निर्मितीचे चांगले कार्य त्यांनी केलेले आहे. कालकतीत नितीन सरोदे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य होते, त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी अहोरात्र समाजामध्ये बौद्ध धम्माचा सतत झटत असत. त्यांचे विचार चांगले आणि शुद्ध होते. ते नेहमी विहारात येत होते. धम्माची आवड त्यांना होती, ते आपली ड्युटी करीत असताना आकस्मिक गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला. त्यांचे अचानक निघून जाणे हे धम्माच्या कामांमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहारातर्फे प्रथम स्मृतीदिनानिमित्त नितीन सरोदे यांना आदरांजली वाहून त्यांनी धम्मदेशना पूर्णविराम दिला. पाहुण्यांचे स्वागत आणि आभार उषा कांबळे संचालिका यांनी केले त्यांनीही नितीन सरोदे यांना आदरांजली वाहिली. विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी मोठा पाऊस येऊन सुद्धा चांगली उपस्थिती होती, तसेच अचानक पाऊस आल्यामुळे भंतेजी येऊ शकले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच चंद्रकांत नागवंशी व सी.बी. चौधरी यांनी अचानकपणे दम्मदेशना देण्यास विनंती केल्यानुसार त्यांनी लगेच होकार देऊन धम्मदेशना दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच विहारांमध्ये पुढील वर्षावासाच्या कालावधीत पूर्ण वेळ भिखू यांना नक्कीच आपण पाचारण करू असे सांगितले. त्याप्रमाणे विहारांमध्ये थोडी गैरसोय असल्यामुळे या वर्षावासाच्या कालावधीत त्यांना वर्षावास करण्यासाठी थांबविता आलेले नाही. श्रावण पौर्णिमेनिमित्त अर्थदान दिले त्यांचे कोलप सर यांनी आभार मानले आणि त्यांचा सत्कार केला. सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी श्रावण पौर्णिमेनिमित्त रक्कम रुपये 500/-अर्थ दान, त्याचप्रमाणे सुहास धोत्रे यांनी पाचशे रुपये तसेच धनवडे सर यांनी पाचशे रुपये अर्थ दान दिले त्याबद्दल या तिघांचा गौरव व सत्कार करण्यात आला . दानं ददनतू सदाय, श्रद्धेने दान देणे हे उत्तम मंगल होय त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत असते असे डॉक्टर सुधीर कोलप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून धम्मपालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाचे सांगता झाली . श्रावण पौर्णिमेनिमित्त कालकतीत नितीन सरोदे यांच्या कुटुंबीयांनी सर्व उपस्थित यांना खीरदान दिले.

