मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या सिंदी रेल्वे ते सेलडोह रस्ता हा 7 किमी अंतराव असून तो समृद्धि महामार्ग वर्धा नागपुर बुटीबोरी सेवाग्राम हा शहराकडे जाण्याकरीता सिंदी रेल्वे वासीयाना व सेलडोह वासियाना जाण्यास सोयीस्कर आहे. याच रस्त्याने शाळेचे व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षणा करीता नागपुर, वर्धा, सेलू, सेवाग्राम येथे रोज जाणे येणे करतात. पण सध्या या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्यामुळे परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात सिंदी रेल्वे ते सेलडोह रस्ताचे काम करीता अंतिम संस्कार आंदोलन करण्यात आले.
सन 2018 पासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे. अनेक दा या परीसराताल नागरिक या पावसाळ्यात रस्तावरील खड्डाच्या अंदाज न आल्याने वाहनासहीत खड्डात पडून गंभीर अपघाताला समोर गेले आहे. या अपघातात काही नागरिक मृत्युमुखी पडले आहे. तरी शासन आणि प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.
दर वर्षी सिंदी येथे तान्हा पोळाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असते. यावेळी संपूर्ण विदर्भातून लाखो नागरिक यात सहभागी होते असते. त्यामुळे नागरिकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे नागरिकाच्या भावने उद्रेक होणाच्या आधी ज्या ठेकेदाराला रस्ताचे काम दिले आहे त्याला लवकरात लवकररस्ताचे काम सुरू करून पूर्णतास नेनास बाध्य करावे व रस्ता त्वरीत पूर्ण करावा अशे निवेदन तहसीलदार सिंदी मार्फत जिलाधिकारी वर्धा याना देण्यात आले.
या प्रसंगी अजय तुलमले, संजय भोगाडे, भिमराव फूलमाळी, नरेन्द्र मुटे, बापूजी चरडे, प्रशांत कामडी, बालूभाऊ भिसीकर, राणूभाऊ वुथलकर, राजू नखाते, धनराज निमजे,, अनिल ढोबळे, युवराज रोडे, दीपक गवळी, माणीक येडे, राजू सोनटक्के फीरोज जी बेग, सोनू पाटील, बंडू फटीक, राजू दांडेकर, दिनेश लोहकरे, ईश्वर भुते, जीवन डाहाके, मोरेश्वर सातपूते, राजेन्द्र वरूडकर शुभम तलमले सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

