मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज सिरोंचा:- शहरातील मुख्य रस्त्यामधे दुभाजकची लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुरमवार यांनी सिरोंचा येथील तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांना निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हातील शेवटचा टोकावर असलेल्या प्राचीन काळा पासून असलेल्या सिरोंचा – आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग बांधकाम सुरू असुन सिरोंचा शहरामधून बि.आर.ओ चौक ते शिवाजी चौक पर्यत जाणाऱ्या मुख्य रस्त्यामधे दुभाजक (डिव्हायर) बनवून त्यात झाडे लावावी यामुळे सिरोंचा शहराचे सौंदर्यीकरण होईल आणि भविष्यात होणारे अनेक अपघात टाळण्यासाठी मदत होईल. याची मागणी सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत सुगरवार यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांच्या कडे तहसीलदार सिरोंचा यांचा कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.