✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- शहरात मागील काही दिवसात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्यने वाढ होत असताना दुचाकी चोरट्यांचाही शहरात सुळसुळाट सुटला आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या इमारतींचा पार्किंगमधूनही दुचाकींची चोरी होत असल्यामुळे मोकळ्या जागेत वाहन पार्क करताना नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
नाशिक शहरात सोमवारी दि.१९ एकाच दिवसी मुंबईनाका, इंदिरानगर व आडगाव पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. यात मुंबईनाका भागातील पखाल रोड परिसरातून काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक एमएच १५ एई ५८७६ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी महोम्मद कैफ नाझीमुद्दीन काझी २०, भक्तीनगर सोसायटी याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे.
तर दुसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणेनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी कृषीनगर येथील नितीन शरद पाटील यांनी इंदिरानदर पोलीस ठाण्याच त्यांची मोपेड दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाटील यांनी राणेनगर येथील अतुल्य रेणू होम्समध्ये पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीसरी घटना घडली आहे. विरेंद्र श्रीहरीप्रसाद द्वीवेदी ५०,रा. महालक्ष्मी अपार्टमेंट मोकाळ बाबानगर यांनी तपोवन पर्णकुटी मंदिरासमोर पार्क केलेली मोटार सायकल एमएच १५ ई यू ५४७९ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यामुळे त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखलकेला .