अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार समीर कुणावार यांच्यावर स्थानिक अनुसया मंगल कार्यालयात सुरू असलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या सेफ्टी किट व गृहोपयोगी वस्तूंच्या कार्यक्रमावर अतुल वांदिले यांनी आरोप लावले.
असविधानिकपणे हे शिबिर आमदार समीर कुणावर यांनी घेतली असल्याने नागरिकांना सुविधेचा फटका बसला असून समीर कुणावर यांनी राजकीय प्रचार या शिबिराच्या माध्यमातून केला आहे. आणि महिलांना अनेक प्रकारचे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. असे अनेक प्रकारचे गंभीर आरोप पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी लावले होते.
याच मुद्द्यावर आज आमदार समीर कुणावर यांनी शिबिराच्या ठिकाणी अनुसया मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार समीर कुणावर यांनी यासंदर्भात आरोपाचे खंडन करीत उत्तर देताना त्यांनी आता पर्यंत चार कामगार शिबिराचे आयोजन केले असून हे पाचवे कामगार कल्याण विभागाचे शिबिर आहे. येणारी विधानसभा निवडणूक पाहता विरोधकांजवळ मुद्दे नसून विरोधकांनी चांगल्या कामाला विरोध करायला सुरुवात केली आहे. माझ्या चांगल्या कामामुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत असून त्यांना माझे चांगले काम पाहाणे जमत नसून त्यांनी विरोध करने सुरू केले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या आरोपाची मी चिंता करत नाही जनता माझ्या सोबत असून जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे विरोधक आपला विरोध दर्शवित आहे. यामुळे या सर्व गोष्टीला मी घाबरत नाही असे सांगितले.
कामगार कल्याण मंडळाच्या कडून कामगाराच्या नोंदणी संदर्भात समीर कुणावर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कामगाराची नोंदणी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी नोंदणी केली असून त्या संदर्भात अधिकारीच माहिती देऊ शकते असे उत्तर पत्रकार परिषदेत दीले. या शिबिराच्या आर्थिक खर्चा संदर्भात माहिती विचारली असता ते देण्याचे टाळले.
शिबिरात पेटीवर आणि घरगुती साहित्य वापराच्या बॉक्सवर लावलेल्या स्टिकर संदर्भात माहिती देताना त्यांनी म्हटले की शासनाच्या नियमाप्रमाणे स्टिकर लावले आहे. मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार असून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या हा माझा उद्देश आहे आणि जनतेला लाभ मिळावा त्यामुळे याचे आयोजन केले आहे.
जनतेचा सरकारमधील प्रतिनिधी असून मी लावलेल्या माझ्या स्टिकर बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा फोटो आहे हे शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आहे.
संबंधित शिबिराची शासनाकडून रितसर परवानगी
घेतली असून पालकमंत्री वर्धा जिल्हा यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे मला हे शिबिर दिले आहे आणि कागदोपत्री पुरावा असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेमध्ये अतुल वांदिले यांनी अधिकाऱ्याची ध्वनी फीत ऐकवली आहे या संदर्भात प्रश्न विचारला असता. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकारचे लेखी पत्र द्यायला पाहिजे होते असे यावेळेस उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.