प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मोर्शी:- वरुड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील पक्षाची सद्यस्थिती तपासून पाहण्यात आली तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी संघटन मजबूत करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या गेल्या.
या बैठकीस खा. डॉ. अनिल बोंडे, नितीन गुडघे पाटील, विवेक गुल्हाणे, अर्चना मुरूमकर, रूपाली सोंडे, माधुरी भगत, मनोहर आंडे, दत्ता पाटील गेडाम यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे पक्षाच्या विजयासाठी झटण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीतील निर्णयांमुळे मोर्शी – वरुड मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक सशक्त होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल असा ठाम विश्वास आहे.