✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- मधील डोंबिवली येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेतील कोपर रोड परिसरात सायंकाळी 4 च्या सुमारास मध्य रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली. यात 5 मजूर भिंतीखाली अडकले होते. त्यात दोन मजुराचा मृत्यू झाला असून तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे.
रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तुरंत बचाव कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मजुरांना बाहेर काढत महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.