हिंगणघाट:- येथील जुन्या वस्तीतील मल:निस्सारण शुद्धीकरण केन्द्रात दि.18 जुलैला जवळपास 12 तासापासून अडकलेल्या हिंगणघाट नगर परिषदेचा तीन कर्मचाऱ्यांना शहरातील 9 युवकांनी अक्षरशः जिवावर उदार होत बाहेर काढले आणि त्या कर्मचार्यानी सुटकेचा श्वास सोडला.
येथील जुण्या वस्तीतील मोकळ्या मैदाना वर नगर परिषदेचे मल शुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रावर रात्रपाळीचे तीन कर्मचारी काल दुपारी आपल्या कर्तव्यावर गेले होते. त्यावेळी वातावरण सामान्य होते. परंतू सायंकाळी 7 वाजल्या नंतर अचानक मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आणि बघता बघता हे केंद्र पाण्याच्या विळख्यात व्यापून गेले. वणा नदीचे पाणी या केन्दाच्या चहूबाजूने वेढल्या गेल्याने हे तिन्ही कर्मचारी वरच्या मजल्या वर गेले. खालचे शटर बंद असल्याने व शटर भोवती पाणी जमा झाल्याने या लोकांना बाहेर निघणे व काढणे कठिण काम झाले होते. ही माहिती माजी नगरसेवक धनजय बकाणे यांना कळताच त्यानी तातडीने आपल्या सहकार्यासह घट्नास्थळी धाव घेतली. हे नऊही युवक “वेगात विर दौड़ले साथच्या प्रमाणे त्यानी भर रोरावत्या पाण्यात उड्या घेतल्या आणि अर्ध्या कीलोमीटर अंतरापर्यत पोहत या केन्द्रा पर्यंत पोहचले परंतू हाय रे दैवा! शटर बंद होती मग अखेर या सर्वांनी वरच्या मजल्यावर पोहचत वरचा मजला गाठला. त्या ठिकाणची एक खिडकी फोडली आणि त्या तिघाना बाहेर काढले त्या नंतर ट्यूबच्या सहाय्याने या तिघांना बसवून सुखरुप बाहेर काढले. हे बहाद्दर युवक आहेत हिरामण मोरे, देवा जोशी, अतुल मोरे, धनंजय बकाणे, सुरज काटकर, अतुल मांडवे, वाल्मिक थूल, खटु तुपे, महेंद्र मांडवे हे ते साहसी विर युवक आहेत. यांच्या जिद्द आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रवी डुगरवाल, नवलबाबू मानधनिया, प्रविण उपासे, प्रमोद गोहणे, रवी काटवले, राजु खांडरे यानी अभिनंदन केले आहे.