अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचारमंच हिंगणघाट ही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रगण्य संघटना असून या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभिनव संस्कार शिबिर, सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांना रक्ताचा पुरवठा करणे, विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी ची ओळख व्हावी म्हणून विविध प्रकारच्या कार्यशाळा, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरिता संवाद, कौशल्य शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम पारिवारिक व कौटुंबिक प्रबोधन अश्या कार्यक्रमाचे नियमितपणे आयोजन केले जाते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेंबा येथे या संघटनेकडून स्कूल बॅगचे वितरण करण्यात कऱण्यात आले.
आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सूर्यकांत आखाडे, शेखर दाते, किशोर कुंभलकर हे अभिनव विचार मंचाचे सदस्य उपस्थित होते. तसेच रंजीत ठाकरे, अंकुश वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक पंढरी तडस, विवेक गायकवाड, अनिल नाईक, करूणा सुत्रावे, कु. बनसोड उपस्थित होते. यावेळी वर्ग 1 ते 7 च्या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आली. अभिनय विचार मंचाचे सूर्यकांत आखाडे, किशोर कुंभलकर, शेखर दाते यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पंढरी तडस तर संचालन विवेक गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल नाईक यांनी केले.