प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते दिनांक 27 ऑगस्ट रोजी सिंदी (रेल्वे) विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आमदार समीर कुणावार यांनी विशेष निधी आणून सिंदी (रेल्वे) येथे विकासात्मक राजकारण करतांना आपण बघत आलो आज पुन्हा सिंदीच्या विकासासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध तेणे आणि मतदार संघाचा विकास व्हावा या प्रेरणेने सातत्याने झटणारे आमदार समीर कुणावार यांनी आपल्या विशेष निधीतून काल आपल्या सिंदी शहरात डीपीडीसी मार्फत सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात गौरी गणपती विसर्जन घाट व त्याचे सौंदर्यिकरण नदिकाठला सुरक्षा भिंती साठी २ कोटी निधी उपलब्ध करून दिला त्याच सोबत रेल्वे स्टेशन परिसरात बागीच्या मध्ये वॉकिंग ट्रॅक, पेपर ब्लॉग व रुक्षारोपण त्या बागीच्याच्या सौंदर्यिकरण साठी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला.
विजय विद्यालय समोरील ऑक्सीजन पार्क च्या बाजूची सांड पाण्याच्या नाली करीता १५ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले. शिवप्रेम मंगलकार्यालय ते महालक्ष्मी मंगलकार्यालय समोरील रोड करीता २० लक्ष निधी उपलब्ध करून दिला. प्रगती चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रोड करीता १५ लक्ष रुपये निधी दिला. बस स्टँड परिसरातील नूतनीकरणासाठी १५ लक्ष निधी दिलाय. मटण मार्केट परिसर विकासासाठी २० लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच सोबत नगर विद्यालय मागच्या परिसर सौंदर्यिकरणकरण्या साठी २० लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच सोबत मस्तान शहा येथील विकासासाठी १० लक्ष आपल्या विशेष निधितून आमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.