उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ ,श्रावस्ती विहार सांगली येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास पावन पर्व रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीमध्ये ऍड. सुगंध वाघमारे पलूस भारतीय बौद्ध महासभा सांगली यांचे उपस्थितीमध्ये महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेस धूप दीप पुष्प देऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एस. आर. माने यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संजय घाडगे यांनी त्रिसरण, पंचशील, बुद्ध, धम्म, संघ, वंदना व भीम स्तुती गाथा पठण केले. त्यानंतर विहाराचे संचालक सी. बी. चौधरी यांनी ॲड. सुगंध वाघमारे यांचा परिचय देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी ॲड. सुगंध वाघमारे हे धम्मदेशना देतेवेळी म्हणाले की, त्रिसरण, पंचशील, बुद्ध धम्म, संघ, वंदना या गाथा नुसत्या म्हणून अथवा पठण करून चालणार नाहीत, तर त्याचा अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. बौद्ध धम्म म्हणजे नेमके काय ? तसेच बौद्ध उपासकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलीच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करणे आवश्यक आहे. पंचांग प्रणाम म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व विशद केले. जसे आपण पाणी व आहार शुद्ध घेतो, त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण शुद्ध व पवित्र ठेवणे आवश्यक आहे. याबाबत शुद्ध पाण्याचे उदाहरण दिले, जसे एका मोठ्या टाकीमध्ये पूर्णपणे शुद्ध पाणी भरून ठेवले आहे, परंतु त्यामध्ये गटार मिश्रित व थोडे विष मिश्रित पाणी मिसळले तर संपूर्ण शुद्ध असलेले पाणी अशुद्ध होते, ज्यांनी हे पाणी अशुद्ध केले आहे तो ते पाणी पिणार नाही, पण ज्यांना माहित नाही ते पाणी पितील व ज्याने अशुद्ध पाणी केले तो कुशल कर्म केले आहे त्याला आज ना उद्या त्या कर्माचे फळ नक्कीच मिळणारच. जे पेरेल ते बीज उगवेल हा निसर्गाचा नियमच आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध विरासत आपणा सर्वांना दिलेली आहे, ती टिकवण्यासाठी पुढील पिढी सक्षम बनवणे आवश्यक आहे आणि आता ही काळाची गरज बनली आहे. कुशल व अकुशल कर्माचा सिद्धांत समजावून सांगितला. उच्च वर्गीय होण्यासाठी आपण विशुद्धीच्या मार्गाचे जीवन जगण्याचा मूळ मंत्र दिला. दहा पारमिता आहे, त्यामध्ये दान पारमिता ही सर्वश्रेष्ठ असून सम्यक आजीविकेतून आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के दान श्रद्धेने देणे आवश्यक आहे. मनात कोणताही हेतू ठेवून दिलेले दान कुचकामी ठरते, त्या दानाचे योग्य ते फळ मिळत नाही. सब्ब दानम धम्म दानं जीनाती! सर्व दानामध्ये धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे प्रकार भरपूर आहेत धम्मासाठी जे दान दिले ते धम्मदान होय. परंतु अन्नदान, अवयव दान, पुण्य दान, अर्थ दान परंतु कार्यक्रमासाठी बोलविण्यात आलेले कोणतेही अपूर्ण ज्ञानाचे भंतेजी कार्यक्रम संपल्यानंतर सांगतात की, धम्मदान द्यायला सांगा. वास्तववीक पाहता, त्यांनी अर्थ दान द्या, असे म्हणणे आवश्यक आहे. याचाच अर्थ भंतेजी सुद्धा परिपूर्ण ज्ञानी, हुशार, कुशल व शीलवान आवश्यक असेल तर समाजामध्ये धम्म समजावून सांगणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार होणे सोपे व सरळ होणार आहे. धम्म समजावून सांगणे सोपे आहे, परंतु तो आचरणात आणणे अत्यंत कठीण व अवघड आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून आपणास विशुद्धीचा बौद्ध धम्म दिला आहे, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार विहारांमध्ये येताना स्वच्छ पांढरे कपडे परिधान करून मनातील अहंकार बाजूला ठेवून काढून टाकून एकमेकांचे द्वेष उफाळे तापाळे न काढता सर्वांनी विहारामध्ये एकत्रित येऊन धम्म वाढवणे साठी प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील पिढीसाठी/ भावी पिढीसाठी संस्कार वर्ग सुरू करून सदरची पिढी सक्षम कर्तबगार हुशार आणि धम्ममय बनवली पाहिजे हीच अपेक्षा बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्याकडून केली, कारण हे विहार जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाजले जात आहे, त्याचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एक एकोपाची भावना सक्षमपणे कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. भारतामध्ये बौद्ध धम्मात एकूण 84 हजार गाथा व स्तूप आहेत. इतक्या गाथा असून सुद्धा सर्व गाथांचे सार म्हणजे धम्मपालन गाथा होय. सब पापस अकरणं कुसलस उपसंपदा सचित्त परीयोद पन एत बुद्धदान सासन भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म वाढविला आहे त्यानुसार आपण विहारातून बाहेर पडणे आवश्यक आहे धम्म उपदेश तयार झाले पाहिजेत यासाठी आपणास 365 दिवसाचा आराखडा तयार करावा लागेल बौद्ध धम्माचे संस्कार सर्वावर रुजवणे आवश्यक आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत चे सर्व संस्कार महा परित्राण पाठ यामध्ये नमूद आहेत हे सर्व संस्कार बौद्ध धम्मातून हिंदू धर्मवाद्यांनी चोरून घेऊन त्यात थोडी भेळ मिसळ करून त्याचे ते आचरण करीत आहे परंतु सध्या आपण त्यास विरोध करीत आहोत उदाहरणार्थ सर्व राम मंदिरामध्ये कन्वर्ट झालेले आहेत आपली परंपरा नष्ट केली जात आहे एका बौद्धाचार्यशी विचारले तुम्ही काय करता तर तो म्हणाला मी विधी करतो म्हणजे समाजामध्ये फक्त पाठांतरच दाखविले जाते ही पोपट पंछी आहे उपोसतवृत्त आणि त्याचे महत्त्व सांगितले उपोसतवृत्ताचे पालन केल्याने आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होत असतात ही अनुभवाची बाब असून ती स्वतःलाच समजून येते धम्माचा उपदेश करणारी व्यक्ती सक्षम आचरणशील हुशार व शीलवानच पाहिजे महाकारुणिक भगवान बुद्धांनी अहिसेस महत्व दिले आहे काया, वाचा आणि मनाने पालन करणे आवश्यक आहे .हिंसा करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, सदाचाराने वागणे, व्याभिचार न करणे ह्या पंचशीला च्या बाबी आहेत. याचे पालन सर्वांनी तंतोतंत करावे .भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून आपण बौद्धच आहोत .मध्यंतरी फक्त ह्या ब्राह्मणवाद्यांनी आपणास अति शूद्र बनविले आहे. त्यामुळे आपण सर्व एकत्रित रित्या संघटित झालो तर नक्कीच यांना पराभूत करू शकतो. म्हणून सर्व मतभेद विसरून संघटित होणे आवश्यक आहे. ही सर्व अपेक्षा बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्याकडून त्यांनी केली आणि त्यांच्या वाणीस पूर्णविराम दिला. त्यानंतर मिरज येथील न्यायाधीश शैलेश कंठे हे जज 39 व्या वर्षी बुलढाणा येथे हृदयविकाराने अचानक निधन झाले असल्याने दयानंद कांबळे यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहने साठी आणि साठी सर्वांनी मौन पाळणे बाबत विनंती करून विहारा मार्फत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विहाराच्या उपाध्यक्ष सुनीता धम्मकीर्ती यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानून धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रम सांगता झाली या कार्यक्रमास विहाराच्या संचालिका उषा कांबळे, शैलजा साबळे, संजय साबळे, पारमित धम्म कीर्ती, राहुल कांबळे चंद्रकांत नागवंशी सर ,सौ.शोभा कांबळे अमर कांबळे शैलेश कांबळे .. कवठे कर सर ज्येष्ठ माजी संचालक सावंता काटे ,बोरखडे मामा तथा बोधिसत्व धम्म रत्न ,इत्यादी सर्व माता भगिनी उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.