मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिनांक 29 ऑगस्ट पासून नक्षलपीडित अनेक परिवाराने आपल्या विविध मागण्यासाठी गड़चिरोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात अनेक नक्षलपीडित कुटुंब सामील झाले आहे.
गडचिरोली जिल्हा नक्षल पिढीत परिवाराचे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू असून या उपोषण स्थळी बहुजन समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हा प्रभारी भास्कर मेश्राम, सुधीर वालदे व पार्टी चे पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन नक्षल पिढीत कुटुंबीयांचे जे मागणी आहे ते शासन दरबारी पोहोहचू अशी आश्वासन दिले आहे. या वेळी जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गुप्ता, राजेंद्र बोरकूट, ज्ञानेश्वर रामटेके, सुशीला तुमरेटी, गणपत कावरे, मोनिका मडावी, रूपा कुपलवार, ज्योती सुनकरी, महेश अरमे, विजय कुंबरे, सुरेखा उसेंडी, रेश्मा पुंगाटी, सुरेश तोडसम, लता उसेंडी, गीता मानेम, साईनाथ पुंगाटी, मधुकर पोटावी, अविनाश नरोटे, सुरेश तलांडे, नितेश कुमोटी, श्रावण गोटा, योगेश पुडो, सुनिता नैताम, संदीप गावडे, नक्षल पीडित सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.