पल्लवी मेश्राम, उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी आज दि.28 ऑगस्ट रोजी सायं 4.00 वाजता पोलीस भवन येथील कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी सराफा असोसिएशनच्या अध्यक्ष व सदस्य असे 100 सराफा व्यापाऱ्यांची बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये सराफा व्यवसायिकांकडून चोरीची/ संशयित मालमत्ता जप्त करताना पोलिसांनी अमलात आणायचे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी, सराफांच्या व्यवसायिकांच्या अडीअडचणी, दक्षता समितीच्या कार्य पद्धती बाबत चर्चा केली.
यावेळी असोसिएशन सदस्य यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या की, सोने चोरी करणाऱ्या चोराला पकडल्यानंतर पंचनामाच्या प्रति सराफा व्यवसायिकांना पोलिसांकडून पुरविण्यात याव्यात. दक्षता समितीचे कार्यप्रणाली प्रभावीपणे अवलंबविण्यात यावी. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून जास्त प्रमाणामध्ये सोने हे रिकव्हर केले जातं याबाबत सराफा व्यवसायिकांना नेमकं काय तपासात सुरू आहे हे कळत नसतं तसेच सायबर गुन्हेगारी वाढली असून सराफा व्यवसायिकांना देखील गुन्हेगाराकडून फसवणुकीचे कॉल्स येतात. यामध्ये मदत करण्यात यावी. सराफा संघटनेची दर 3 महिन्यांनी बैठक घेण्यात यावी. दक्षता समिती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे यांना नियुक्त करावे. संशयित ज्वेलर्स याचेवर आरोप सिद्ध होत नाही परंतु पोलिसांकडून त्याला पोलीस वाहनांमध्ये नेण्यात येते. पुढे त्याची भूमिका संशयास्पद नसल्याने त्याला सोडल्या जातं परंतु यामुळे त्या ज्वेलर्सची नाहक बदनामी देखील होते. याबाबत कार्यप्रणाली राबविण्यात यावी. संध्याकाळी सराफा बाजारात समाजकंटक त्रास देतात, अतिक्रमणाच्या वेळी, गुन्हेगार आणि समाजविरोधी तत्वांना रोखण्यासाठी पोलीस उपस्थिती आवश्यक आहे. असे विविध समस्या, अडीअडचणी चे मुद्दे सराफा व्यवसायिकांनी पोलीस आयुक्त यांच्यासमोर मांडले.
नागपूर पोलीस आयुक्त यांनी सराफा व्यावसायिकांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले. त्यांच्या अडीअडचणी व समस्या समजून घेतल्या आणि सराफा असोसिएशन यांना त्रास होणार नाही याबाबत पोलिसांकडून दक्षता घेण्यात येईल असे आश्वासित केले. सराफा असोसिएशनच्या व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दक्षता समिती अजून प्रभावीपणे कार्य करेल, पोलीस स्टेशन स्तरावर तपास अधिकारी यांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर पंचा समक्ष चोरीच्या मुद्देमालाची चौकशी करेल. तपासी अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना प्रथम खबर अहवाल अथवा गुन्ह्याची संबंधित माहिती व आरोपीकडून हस्तगत केलेली मालमत्ता याची छायांकित प्रत अथवा माहिती देणे बंधनकारक आहे याबाबत आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सूचना दिल्या आहेत.
सराफा व्यवसायिकांचा जबाब दुकानातच नोंदवला पाहिजे आणि या सर्व सूचना आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर दिले आहेत असे पोलीस आयुक्त यांनी बैठकीत सांगितले. पोलीस हे सराफा असोसिएशन यांना मदत करायला तयार आहे परंतु सराफा व्यवसायिकांनी देखील सराफा बाजारात सोन्या-चांदीचे व्यापार करणारे गहन ठेवणारे सुवर्णकार या सर्व व्यक्तींची पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे आणि याबाबतची माहिती पोलीस ठाणे येथे देणे बंधनकारक आहे. सराफा व्यापारी कडे येणाऱ्या व्यक्ती यांची ओळख पटवून घेण्यासाठी अधिकृत ओळखपत्र यांची छायांकित प्रत घेतली पाहिजे व याबाबत स्वातंत्र्य नोंदवही देखील असली पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सराफ व्यवसायिकांनी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित करावी. पोलिसांकडून तपासी अधिकारी यांना यांना 5 दिवसात तपासी बाबत खुलासा देखील केला पाहिजे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी नागपूर शहरात पोलिसांकडून क्राईम जीपीटी चा वापर केला जात असून ही एक अत्याधुनिक पद्धत नागपूर शहरांमध्ये नागपूर पोलिसांच्या वतीने वापरत आहोत. या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारांची मोडस समजण्याकरिता मदत होते. सराफा व्यापारी आणि पोलीस यामध्ये संबंधांची जपवणूक व्हावी याकरिता आम्ही सर्व पोलीस निरीक्षक यांना ठाण्यामध्ये बैठक न घेता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन बैठक घेण्याबाबत सूचना केलेले आहे. पोलिसांकडून सराफा व्यापाऱ्यांना त्रास विनाकारण दिले जात असेल तर याबाबत आम्हास अवगत करावे आम्ही संबंधित पोलिस मलदार यांच्यावर कडक कारवाई करू असे देखील आश्वासन पोलीस आयुक्त यांनी यावेळी दिले.
पोलीस आयुक्त यांनी आपण सर्वांनी वॉचमन ठेवावा तसेच स्वतःच्या सुरक्षते करिता योग्य ते उपाय योजना कराव्यात असा देखील संदेश दिला. सदर बैठकीत सह पोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनिता मोरे कोतवाली / लकडगंज विभाग हे उपस्थित होते.