श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आपल्या स्वप्नात जरी एखादा अपराध घडलेला असेल तरी त्याची प्रायश्चित्त करणे हे उचित वाटते. कारण ही घटना आज स्वप्नात घडली ती उद्या आपल्या चरित्राचा भाग बनू शकते असेच आजच्या आनंद गणेश दरबारात चातुर्मास कालीन प्रवचनात पर्युषण पर्वातील तिसऱ्या दिवसाच्या प्रवचनमालेत विषय होता वर्तमानातून वर्धमान अर्थात आजच्या युगात भगवान महावीरांच्या विचारांची आवश्यकता आणि यावर विचार मंथन करत होते.
खानदेश केसरी तप महर्षि उपप्रवर्तक पु. अक्षय ऋषी महाराज ते म्हणाले पर्युषण पर्वाच्या पावन दिवसावर मंगल प्रसंगी आपणास आपले जीवन पवित्र बनवायचे आहे वर्तमानात जगायचे आहे. भूतकाळ हा स्वप्नात जमा आहे. भविष्याचे चिंतन करायचे आहे. त्यासाठी वास्तवाचे जीवन जगायचे आहे. वर्तमान हा आपला नसतो हे केवळ म्हणायला असते मात्र वर्तमान हाच आपला असतो याच वर्तमानात भगवान महावीराला वर्धमानाच्या रूपात पाहायचं आहे. आज त्या वर्धमानाची आवश्यकता आहे जो वर्धमान पुढे महावीराच्या रूपात अवतरला आजही महावीर नको मात्र महावीराने ठेवलेली सिद्धांत जे महत्त्वपूर्ण आहेत त्यांचा विचार करायचा आहे. या अवसरणीकाळात आम्ही जन्माला आलो ही आमचे परम सौभाग्य आहे. कारण याच काळातून दुःखाचे मूळ कळून येते दु:ख कळण्यासाठी भगवंताची वाणी कळणे गरजेचे होते आणि माणसाच्या जीवन उत्क्रांतीमध्ये जीव टप्प्या टप्प्यातून वावरतो मानव आज पाचव्या टप्प्यातून वावरत आहे तर चौथ्या टप्प्यात संत महंत तीर्थंकराचा अवतार असतो. आणि याच तीर्थंकराच्या शृंखलेत भगवान महावीर शेवटचे 24 वे तीर्थंकर म्हणून उदयास आले. आणि त्यांनी त्यांना मिळालेल्या केवळ ज्ञानातून आपणासाठी जो त्यांच्या अंतिम समयीउत्तरायणातून आत्मबोध केला आहे तोच आमचे जीवन उद्धारीत करण्यासाठी गरजेला येणार आहे.
भगवंताची जी वाणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती शांतीने जीवन जगण्याला आस्थेने श्रद्धा ठेवण्याला एक मात्र मार्ग आहे. भगवंताने जो मार्ग दाखवला तो श्रेयस्कारी कल्याणकारी आहे. अन्य मार्ग पतनाच्या मार्गाकडे घेऊन जातात केवळ भगवंताचा मार्ग आपणासाठी श्रेयस्कर आहे. म्हणून भगवान महावीराचा सिद्धांत महत्त्वपूर्ण वाटतो यातील काही तत्वांचे पालन आमच्यासाठी नैतिकतेतून सफल वाटतात ज्या तत्त्वावर जैन धर्म पूर्णतः आधारित आहे अहिंसा, सत्य ,अचौर्य, अपरिग्रह, आणि ब्रह्मचर्य यातील सिद्धांताला अंशतः जरी पालन केले तरी आपण महान बणू शकतो. याचसाठी श्रावक आणि साधू या दोघांमध्येही सात्वीकतेची वीरति (वृत) असावी अशा वीरतेतून अंशकालीन जरी त्याचा वापर झाला तरी ती आदर्श वंदनीय पूजनीय ठरतो.
अहिंसा हे महान तत्व आहे याच तत्त्वावर आज धर्मा व लंबावर भगवान महावीराच्या अहिंसेचा प्रभाव आहे अहिंसा काही क्षणात मानवाला पावन करते वैदिक धर्मात हिंसा बंद होऊन अहिंसेला पुढाकार मिळाला आहे. पूर्वी यज्ञाच्या माध्यमातून बळी देण्याची प्रथा होती आज ती काही अंशी बंद वाटते तर याच अहिंसेचे पाईक भगवान गौतम बुद्धाची वडील ही जैनातून अनुयायी होते यालाच अनुसरून भगवान बुद्धाने मध्यम मार्गाने अहिंसेला महत्त्व दिले येशू ख्रिस्ताने जैनक्षेत्र पालिताना येथे येऊन अहिंसेची माहिती घेतली त्यामुळे आज पॅरिस्टिनीला नावलौकिक मिळाला. तर यहुदी धर्माचा संस्थापक मोहम्मद पैगंबर हा राजा बाहुबली होता त्याची एक पत्नी जैन होती तिचा असर या धर्मात पडतो या धर्मातही नमाज पडते वेळी अल्ला हो अकबर अर्थात हे परमेश्वरा तू कबरी वाढवू नको अर्थात अ कबर ठेव म्हणजे शांतताच प्रस्थापित असू दे व आम्हाला पुनर्जन्माच्या चक्रातून वाचव जेणेकरून परत आमची कबर बांधली जाणार नाही हेच सांगितले. नमाज पडताना दोन्ही हातून जी आराधना केली जाते त्या आराधनेत दोन्ही तळहात परस्पराला जोडून त्या तळहातावरील हृदय रेषा जोडल्यानंतर अर्ज चंद्राकार कृती निर्माण होते जी त्या धर्मात पवित्र मानली जाते आणि या कृतीच्या वर बोटावरील 24 उंचवटे हे 24 तीर्थंकराचे साम्यकता पाहण्यास मिळत नाही का अर्थात 24 तीर्थंकर च्या स्वरूपात आढळून येते हे त्याचे प्रतीक समजतात.
देशाला स्वातंत्र्य मिळवून राष्ट्रपिता ठरलेले महात्मा गांधी ही त्यांच्यावरही अहिंसे चा प्रभाव पडला होता आणि याच अहिंसेच्या माध्यमातून सत्याग्रहाच्या संघर्षाने त्यांनी स्वातंत्र्य मिळवले हे करण्याच्या पाठीमागे त्यांचे गुरु बेचरदासजीसावू यांचाच फार मोठा सहभाग होता तर महात्मा गांधीच्या आश्रमात पुरचूरेशास्त्री नावाचे एक ग्रहस्त सेवा कार्य करत असत त्यांना कालांतराने महा रोग झाला या रोगाच्या विलाजासाठी त्यांना नाग भस्म वापरण्याची अनेकांनी सूचना केली हे नागभस्म नागाला जिवंत जाळून त्याची भस्म तयार करणे या क्रियेतून मिळत असे पुरचुरे शास्त्रीने या क्रियेला नकार दिला व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले कारण आपल्या स्वतःच्या सुखासाठी एका निरप्राध प्राण्याची हत्या करणे त्यांना उचित वाटले नाही. ही अहिंसेची प्रचिती नाही काय? मी पूर्व जन्मामध्ये काही पाप केले असेल त्याची फळ आता मला मिळालेले आहे. यात त्या निरप्राध प्राण्याची काय चुकी हे समजून त्यांनी ही औषध रुपी क्रिया करण्यास नकार दिला. तर अहिंसे चा प्रभाव असणारे जागतिक थोर साहित्यिक तत्त्ववेते जॉर्ज बर्नार्ड शाॅ. यांच्या अंत्यसमयी अत्यवस्था अवस्थेत त्यांना आराम पडावा यासाठी औषधी म्हणून गोमांस देण्याचे सुचवले. तर अहिंसेने प्रभावित असलेले बर्नार्ड शाॅ यांनी दयनीय अवस्था राहणे पसंद केले मात्र गोमांशाला नकार दिला असे थोर महात्मे साहित्यिक राष्ट्र सुधारक जर अहिंसेचे पालन करत असतील यावर आपण चिंतन मनन करणे गरजेचे आहे म्हणूनच शाकाहारी व मांसाहारी असणाऱ्या उपहारगृहात आपण जाऊ नये हे पाप कर्म समजले जाते अशीच आपण सत्य अहिंसा अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहाचे पालन करावे म्हणजे महावीराचे अर्थात वर्धमानाचे वर्तमानात रूपांतर झाल्याप्रमाणे होईल अशी त्यांनी सांगितलेधना केली जाते ती चंद्राच्या रूपातून अर्थात 24 तीर्थंकर च्या स्वरूपात आढळून येते.