मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कुरखेडा:- रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान या सर्व दानाला श्रेष्ठ मानले गेले आहे. माणूस मृत पावल्यावर देह नाशिवंत असतो. पण, त्याआधी अवयवाचे महत्व जाणून दान केले तर दिव्यांगाना पुन्हा एकदा जगण्याचा आधार मिळतो. म्हणून मरावे परी नेत्र रुपी उरावे या अनमोल संदेशाचे महत्व जाणून मुळगाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आपले दोन्ही नेत्र स्वइच्छेने दान केले.
आजपर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून समाज जागृती केली आहे सोबतच अनेक सामाजिक उपक्रम सुध्दा नि:स्वार्थ भावनेने राबवले आहेत. नेत्रदान श्रेष्ठ दान समजून समाजाच्या हितासाठी त्यांनी हे प्रेरणादायी कार्य केले आहेत. त्या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले नेत्र चिकीत्सव डॉ.आनंद तागवान, वैधकीय अधिकारी डॉ.राऊत, डॉ.अश्विनी पारधी, संगीता ठलाल यांची आई कुसूम मुंगनकर, नातेवाईक म्हणून तिलक ठलाल, शिक्षका लता राऊत, दै. देशोन्नती तालुका प्रतिनीधी विनोद नागपूरकर, गोकूल खंडगाये, दवाखान्यातील कर्मचारी सुषमा झंझाड,स्वाती मांढरे,मोहीत सकतेल,आनंदसिंग नैताम तसेच दवाखान्यातील रुग्ण तसेच बहुसंख्येने उपस्थिती होते.या प्रेरणादायी कार्यासाठी उपस्थिती असलेल्या सर्व मान्यवरांनी संगीता ठलाल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सोबतच शब्दाचा मान ठेवून वेळेवर उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल संगीता ठलाल यांनी उपस्थितीत मान्यवरांचे धन्यवाद मानले.