भारतीय स्टेट बँक ग्राहक खातेदारांची kyc साठी होणारी गैरसोय तात्काळ टाळयात यावी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- आपल्या स्टेट बैंक ऑफ इंडिया च्या kyc साठी ग्राहकांची गैरसोय होत आहे त्यासाठी ग्राहकांची kyc साठी होणारी गैर सोय तात्काळ टाळण्यात यावी व तसेच पीक कर्जाच्या जाचक अटी रद्द करव्यात व महामंडळाचे कर्ज वाढवुन देण्यात यावे. या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापकांना याना निवेदन देण्यात आले.
बँक मध्ये kyc करण्यासाठी महिला, पुरूष, वृद्ध, अपंग, विद्यार्थी, यांची गैरसोय होत आहे रात्री अकरा ते बारा वाजल्यापासून kyc करण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे. नंबर जो कोणी सकाळी सहा ते सात वाजता येईल त्याला kyc न करता घरी परत जावे लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की तात्काळ स्टाफ वाढवून घेऊन kyc साठी दोन ते तीन खिडक्या सुरू कराव्या आणि ग्राहक खाते. धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली
तात्काळ यावर उपयोजना करण्यात यावी अनस्था स्टेट बँक ऑफ इंडिया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शाखा व्यवस्थाप मॅनेजर विजय राम यांनी नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रवि भदर्गे यांनी दिला.यावेळी निवेदन देताना सचिन सोनपसारे, तालुका महासचिव दिपक वक्ते तालुका महासचिव, गौतम मुंढे तालुका उपाध्यक्ष राजेश साळवे सर्कल अध्यक्ष निवृत्ती पाईकराव, मनोज वंजारे, धम्मा मुंढे, श्रीमंत वक्ते, चंद्रकांत वक्ते सह अनेक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.