बोपापुर येथील नागरिकांनी अतुल वांदिले यांना दिली हाक..
१९९४ पासून पूरग्रस्त कुटूंब पुनरर्वसन पासून वंचित का…?
‘अतुल वांदिले यांनी पूरग्रस्त (पुरपीडित) लोकांच्या घरी जाऊन समजून घेतली आपबीती..
हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यात पाच दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो गावाचा संपूर्ण तुटला आहे . यातच हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे लोकांचा घरात पाणी शिरल्याने ते कुटुंब विस्कळीत झाले. तसेच घरातील गहु, तांदूळ, किराणा सामग्री पाण्यात वाहत गेली. असा पाऊस आणि पूर २५ ते ३० वर्षा नंतर पाहायला मिळाला.परंतु १९९४ पासून पूरग्रस्त कुटूंबाना पुनर्वसन करून त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे.अशी मागणी गावातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस’अतुल वंदिले’ यांच्याकडे केली.