आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी बुधवार ला ज्ञानज्योत बहुउद्देशीय संस्था नांदगाव व्दारा संचालीत रमाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणघाट ता हिंगणघाट जि वर्धा येथील वसतीगृहात व लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सौ. दिपा आर पाटील या संस्थेच्या अध्यक्षा उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रिकबंचद पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना बनसोड अधिक्षीका यांनी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या जिवनावर आधारे प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वशिका भगत यांनी केले संस्थेचे अध्यक्षा सौ दिपा पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष रिकबचंद पाटील यांनी सर्व प्रथम महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे, पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यावेळी यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त त्यांच्या जिवनावर आधारे सविस्तर माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थीनींनी आपल्या भाषणात छान पैकी भाषणं केली. त्यात कुमारी वेदीका राऊत, राखी थुल यांनी छान भाषण केले तसेच सोनु चौके यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती भाषण केले गित गायले तसेच अपुर्वा परमोरे यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त त्यांच्या जिवनावर पोवाडा सादर करून दाखविले स्वागत समिती प्रमुख श्रध्दा कोहळे व परी पाटील प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंजली पाटील यांनी केले सर्व विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील कर्मचारी बांधव श्रीकांत फुलझेले चौकीदार व भुमिका भगत स्वयंपाकी हे उपस्थित होते.