अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपुर तालुक्यातील परडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याला जादुटोण्याच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. यावेळी घटनास्थळी कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी तपासचक्र गतीने फिरवून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी घटनास्थळी एक बिडी बंडल मिळून आल्याने पोलिसांनी शोध घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. किसन लक्ष्मण महाकाळकर असे जीवघेणा हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून गोपाल महाकाळकर असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात इसमाने परडा शिवारात शेतकऱ्याचा गळा कापून डोक्यावर काठीने वार करून जिवंत ठार मारण्याचा प्रकार केल्याची तक्रार समुद्रपुर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाली होती. यामध्ये शेतकरी किसन लक्ष्मण महाकाळकर याना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र पोलिसांकडे कोणत्याही सुगावा नसतांना बिडी बंडलच्या कवर वरुन पोलिस आरोपी पर्यंत पोहचले. घटनेच्या दोन दिवसातच आरोपी गोपाल महाकाळकर राहणार परडा याला अटक करण्यात यश मिळवले.
सदर घटना हि जादुटोण्याच्या संशयावरून सुपारी देऊन शेतकऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या चतुराईने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला. ठाणेदार संतोष शेगावकर यांना घटनास्थळी सापडलेले बिडी बंडलचे कवर हाच धागा पकडून आरोपी पकडले. पुढिल तपास समुद्रपुर पोलीस करीत आहेत.