उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने गतवर्षी प्रमाणे या वर्षी ही अशोका विजयादशमी चे 10 दिवस महामातांच्या विचाराचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका शेवंताताई वाघमारे यांच्या दिप प्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत याच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून मोठ्या थाटात करणेत आले या कार्यक्रमाची सुरवात डॉ. मनीषा जमने याच्या रमाई भीम गीतांनी करण्यात आली सोबत नरवाडे, भारत कदम, यांनी छान आणि मजुळ स्वरा मध्ये आपली गाणी सादर केली.
यावेळी डॉ. यश कश्यपयन भंते यांनी त्रीसरण आणि पंचशील दिले. बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने प्रा. सुनीता धम्म कीर्ती यांनी बौद्ध कालीन महिला महामाता खेम यांचेवर व्याख्यान दिले त्या म्हणाल्या, खेमा ही बुद्धकालीन बौद्ध भिक्खुणी होती, जी बुद्धांच्या उच्च महिला शिष्यांपैकी एक होती. उप्पलनालनासह बुद्धाच्या दोन मुख्य महिला शिष्यांपैकी ती पहिली मानली जाते. खेमाचा जन्म प्राचीन मद्रा राज्यातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. प्राचीन भारतीय मगध राज्याचा बिंबिसार राजा याची ती पत्नी होती. ती अतिशय सुंदर होती तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता जेव्हा तिने भगवान गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकले तेव्हा तिला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली अज्ञान अंधकारातून मुक्त झाली आणि अर्हंत झाली धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये अग्रेसर झाली. असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शैलजा मॅडम यांनी आपल्या मधुर आणि मंजुळ आवाजात केलं. बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली अध्यक्ष डॉ सुधीर कोलप यांनी पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक उषाताई कांबळे यांनी केलं आणि कार्यक्रमाचे आभार अवंतिका वाघमारे मानले. या कार्यक्रमासाठी सभासद संचालक, उपासक आणि उपासिका मोठ्या संखेने उपस्थित होते आणि हा असाच पुढे नऊ दिवस रोज संध्याकाळी सात नंतर सुरू असेल. जर मधे एखादा रविवारी आला तर त्या दिवसाची धम्म देसना ही सकाळी 10 ते 11 या वेळेत होईल आणि यासाठी मोठ्या संख्येने संस्थेच्या. श्रवस्ती विहरा मध्ये मोठ्या संख्येने हजर राहावे असे आव्हान बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली चे उपाध्यक्ष प्रा. सुनीता धम्म कीर्ती यांनी केलेले आहे शेवटी धम्मपाल गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.