Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

राष्ट्रीय स्तरावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंगुलीमुद्रा केंद्राची सर्वोत्तम कामगिरी.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राष्ट्रीय स्तरावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंगुलीमुद्रा केंद्राची सर्वोत्तम कामगिरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रीय अपराध अभिलेख केंद्र (NCRB) नवी दिल्ली यांनी दिनांक २० ते २५ सप्टेंबर २०१२ या दरम्यान २३ वी अखिल भारतीय अंगुलीमुद्रा संचालक परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. सदर परिषदेचे उदघाटन मा अजयकुमार मिश्रा केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येवून, केंद्रीय गृहराज्यमंत्रालयाचे श्री. शामल मिश्रा (IAS) अमर सचिव, भारत सरकार, श्री. विवेक गोगीया (IPS) संचालक राष्ट्रीय अपराध अभिलेख केंद्र, श्री संजय माथुर (IPS) राह-संचालक (CCTNS) राष्ट्रीय अपराध अभिलेख केंद्र, श्री. दिपक एन. दामोर, (IPS) सहसंचालक (प्रशासन) राष्ट्रीय अपराध अभिलेख केंद्र, श्री. रविंद्रकुमार संचालक केंद्रीय अंगुलीमुद्रा केंद्र यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथील श्री. पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, (आर्थिक गुन्हे शाखा) गु.अ.वि. पुणे श्री. श्रीरंग टेकवडे, संचालक/ पोलीस अधीक्षक, अंगुलीमुद्रा केंद्र पुणे श्री. रोहीदास कासार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अंगु.) हे उपस्थित होते तसेच ऑनलाईन वेबकास्टिंग पोर्टलव्दारे केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख व विविध राज्यांचे पोलीस महासंचालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
२३ वी अखिल भारतीय अंगुलीमुद्रा संचालक परिषदेमध्ये अंगुलीमुद्रा विभागाशी निगडीत गुन्हेगाराचे बायोमेट्रिक अभिलेख तयार व जतन करण्याबाबतची कार्यपध्दती नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटीफिकेशन सिस्टीम (NAFIS) अंगुलीमुद्रा तज्ञ प्रशिक्षण इ. विविध विषयांबाबत चर्चा होवून त्याव्दारे सर्व राज्यांच्या अंगुलीमुद्रा विभागाच्या कामकाजामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी निर्णय घेतले गेले. परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय बोर्ड अंगुली दिन्न विशेषज्ञ परिक्षा दरवर्षी घेण्यात येते, सदर परिक्षेस देशातील सर्व राज्यांतून अंगुलीमुद्रा विभागातील पात्र उमेदवार सहभागी होत असतात. सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय बोर्ड अंगुली चिन्ह विशेषज्ञ परिक्षेमध्ये महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र विभागातील श्रीमती प्रियंका सकपाळ सहा. पोलीस निरीक्षक अंमु यांनी प्रथम क्रमांक पटकविल्यामुळे अंगुलीमुद्रा केंद्रामध्ये मानाची असलेली तर अजिज -उल-हक ट्रॉफीव्दारे त्यांना मा. अजयकुमार मिश्र, केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. यापूर्वी सन १९७५ च सन १९९० वर्षी महाराष्ट्र राज्याला सदरची फिरती मानाची ट्रॉफी पटकविण्याचा मान मिळाला होता. तदनंतर ३२ वर्षांनी श्रीमती प्रियंका सकपाळ यांनी सर अजिज उल-हक फिरती मानाच्या ट्रॉफीचा मान परत मिळवून दिला आहे.
परिषदेमध्ये देशातील सर्व राज्यांमधुन ‘स्मार्ट सूज ऑफ फिंगरप्रिंट सायन्स इन इनव्हेस्टीगेशन’ या अंतर्गत अंगुलीमुद्रा ठशांव्दारे गुन्हा उघडकीस आणून आरोपीस शिक्षा लागलेल्या सर्वोत्तम गुन्हयांची माहिती मागविण्यात आली होती. व त्यांचे सादरीकरण सर्व राज्यांच्या अंगुलीमुद्रा तज्ञांनी परिषदेमध्ये केले महाराष्ट्र राज्याच्या अंगुलीमुद्रा तज्ञ श्रीमती सारीका टिळेकर, सहा. पोलीस निरीक्षक अंग यांनी साकीनाका पोलीस ठाणे गुर ९३७/२०२१ कलम३०२,३०१,७३,७६,३२३,५०४,३४ मादपि, अन्वये दाखल गुन्हयाचे सादरीकरण केले. सदर गुन्हयामध्ये मध्यरात्री एका महिलेवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती घटनास्थळी भेट देवुन शास्त्रोक्त पध्दतीने तपासणी करून विकसीत केलेला अंगुली मुद्रा वसा हा आरोपीशी एकरुप झाला.
सदर प्रकरणी हे अतिसंवेदनशील असल्यामुळे ते फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्यात येवुन अंगुली मुद्रा तज्ञांची सावा नोंदविण्यात आली त्यांनी दिलेल्या महत्वपुर्ण साक्षीमुळे आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनविण्यात जालेली आहे अंगुली मुद्रा व्याव्दारे गुन्हा सिध्दतेसाठीचे महत्वाचे योगदान दिल्यामुळे श्रीमती सारीका टिकेकर सहा पोलीस निरीक्षक (अं) यांनी सादर केलेले सादरीकरण हे राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ ठरल्यामुळे स्मार्ट युज ऑफ फिंगर प्रिंट सायन्स इन इनव्हेस्टिगेशन या अंतर्गत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म. राज्य पुणे यांच्या अंतर्गत कार्यरत श्रीमती सारीका टिळेकर सहा पोलीस निरीक्षक (अंमु) अंगुली मुद्रा केंद्र मुंबई यांना श्री विवेक गोगीया (IPS) संचालक राष्ट्रीय अपराध अभिलेख केंद्र यांच्याहस्ते देण्यात आले. या अतिसंवेदनशील प्रकरणाची उकल करण्याच्या महत्वपुर्ण मध्ये श्री श्रीरंग टेकवडे संचालक / पोलीस अधिक्षक, अंगुली मुद्रा केंद्र पुणे श्री संजय रावल संचालक पोलीस अ मुद्रा केंद्र मुंबई व इतर अंगुली मुद्रा अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Previous Post

महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.

Next Post

अमेरिका येथील 6 विद्ध्यार्थानी स्वीकारला बौद्ध धम्म, भारतात येऊन बनले श्रामणेर. आता जगभर पेरणार बुद्धाचे विचार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अमेरिका येथील 6 विद्ध्यार्थानी स्वीकारला बौद्ध धम्म, भारतात येऊन बनले श्रामणेर. आता जगभर पेरणार बुद्धाचे विचार.

अमेरिका येथील 6 विद्ध्यार्थानी स्वीकारला बौद्ध धम्म, भारतात येऊन बनले श्रामणेर. आता जगभर पेरणार बुद्धाचे विचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In