मानवेल शेळके अहमदनगर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हातील श्रीरामपूर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत या प्रकरणी अटक केली आहे.
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. मुरकुटे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले होते. यांची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले. यानंतर त्यांना पोलिस स्टेशन येथे चौकशीनंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.
राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मुरकुटे यांनी बंगला, शेती घेऊन देण्याचे, तसेच मुलाला नोकरीचे आमिष दाखवून 2019 ते 2023 या काळात वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि वेळोवेळी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले. संबंधित महिलेने 7 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांना काही व्हिडीओ व फोटोही दाखविले.