विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायत एटापल्ली येथील मुख्याधिकारी हे दिनांक ३०/९/२४ पासुन कर्तव्यावर नसल्याने नियमित कामे रेंगाळलेली असुन नागरिक येरझारा मारुन हीरमुसले होऊन आल्या पावली परत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगर पंचायत एटापल्ली हद्दीत सहा गावे समाविष्ट आहेत व लोकसंख्या १५००० च्या दरम्यान असुन नगर पंचायतच्या अखत्यारीत बेरोजगार, कर्मचारी, व्यापारी, नागरिक व असंख्य गरजु आहेत. यात शासकीय योजना राबविल्या जाते. या योजनेत अपंग अनुदान ज्यात ५ट क्के तरतूद आहे व १३८००० रक्कम ४४ लाभार्थांना वाटप करावयाचे आहे. त्यात कामगार/विश्वकर्मा योजना, बांधकाम देयके, पी. एम. स्वयंसिद्धी योजना पथ विक्रेत्यांना बिन व्याजी कर्ज, आणि नियमित कामे ज्यात जन्म, मृत्यू, वारसान रहिवासी, विवाह, नोकरीवर असलेले-नसलेले व्यवसाय नाहरकत यासारख्ये अनेक प्रमाणपत्र यापासून गरजु नागरिक वंचित आहेत.
निदान पेंदाम नगरसेवक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्याधिकारी यांना केंव्हा येणार म्हणून संपर्क साधला असता जेंव्हा वाटते तेंव्हा येईन ‘माझी बदली करायची असल्यास करून टाका’अशा प्रकारे उध्दट प्रतिक्रिया प्राप्त झाली. असे सांगितले. व दिनांक १०/१०/२४ ला मासिक सभा असल्याने परत येण्याची संभावणा व्यक्त केली. जर रितसर अधिकृत परवानगी किंवा रजा मंजूर करून गेले असते तर जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी त्यांचा तात्पुरता प्रभार दुसरे अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आला असता.
अशा प्रकारे नगर पंचायत एटापल्लीची कर्मकहाणी आहे व ह्यामुळे नगर पंचायत एटापल्ली नावारूपाला लावारिस झाली आहे.