सौ. हनिशा दुधे, प्रतिनिधी
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. एक विवाहिता आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली म्हणून हताश पतीने तिचा शोध घेतला पण त्यांचा काही सुगावा लागला नाही. माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून पळून नेणाऱ्या प्रियकराच्या वडिलांवर त्याने राग काढत, पत्नीला पळवून नेणाऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या केली. चंद्रपूर जिल्ह्या हा हादळला आहे.
माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. 50 वर्षीय मृतक रामभाऊ पाटील हे माजरी कॉलनी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्या पत्नीला का पळून नेले. पत्नीच्या प्रियकराच्या वर तो राग काढला. सामर्थ्यवान दोन साथीदारांच्या सामंजस्यपूर्ण छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीत बसवून कोराडी नाल्या जवळ. त्याची हत्या केली. उत्साहाला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती वरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली.
विवाहितेचे होते तरुणवर प्रेम.
आशिष पेटकर याच्या पत्नीचे दुसऱ्या एका युवकावर प्रेम जळले. ती रामभाऊ पाटील यांच्या मुलासोबत पळून गेली. याचा प्रचंड राग आशिषला आला. तो रागाच्या भरात रामभाऊच्या घरी गेला. पण, मुलगा तिथं नव्हता. रामभाऊ भेटले. त्यांनाच आशिषने चारचाकी गाडीत बसविले. कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.