राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यात निवडणूक आयोग महाराष्ट्र सरकारविरोधात चौकशी सुरू करणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी लागलेली आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत ही चौकशी करण्यात येणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकी संदर्भात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
घोषणेनंतर सरकारी निविदा जारी केल्या: 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली, त्यानंतर ही महाराष्ट्र सरकारने सुमारे 200 सरकारी प्रस्ताव, नियुक्त्या आणि निविदा आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या, तर निवडणूक आयोगाच्या पीसी नंतर, राज्य सरकारने ही माहिती जाहीर केली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणताही शासकीय निर्णय, आदेश आणि निविदा प्रसिद्ध न करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आले. पण सरकारने आपल्या कृतीतून मागे हटले नाही आणि जे करायला नको होते ते केले.
निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले: राज्य सरकारने आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळनंतर अनेक निर्णय प्रसिद्ध केले. यावर निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केल्यावर सरकारने घाईघाईने आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेले अनेक निर्णय काढून टाकले. आता या प्रकरणाबाबत मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले की, अपलोड केलेल्या सरकारी प्रस्तावांच्या वेळेची आम्ही चौकशी करू आणि त्यातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले की नाही हे तपासू?