प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.22:- निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. देवळी विधानसभा मतदार सघांमध्ये असलेल्या 331 मतदान केंद्र होते. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ज्या मतदान केंद्रामध्ये 1300 पेक्षा अधिक मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राची विभागणी करुन त्या ठिकाणी दोन मतदान केंद्र तयार करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार देवळी विधानसभा मतदार संघात चार मतदान केंद्राची वाढ करुन 335 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.
मतदान केंद्र क्रमांक 70 गुंजखेडा ज्ञानभारती विद्यालय (प्राथमिक शाळा वल्लभनगर) येथील दक्षिनेकडील खोली क्रमांक 1 येथे नव्याने मतदान केंद्र क्रमांक 71 खोली 2 तयार करण्यात आले असून यामध्ये वल्लभनगर वार्ड न. 1 व जोशी प्लॉट येथील मतदाराचा समावेश आहे., मतदान केंद्र क्रमांक 72 खोली क्रमांक 4 तयार करण्यात आले असून जवाहर कॉलनी व गुंजखेडा वार्ड क्रमांक 3 येथील मतदाराचा समावेश आहे..
मतदान केंद्र क्रमांक 72 गुंजखेडा, ज्ञानभारती विद्यालय येथील उत्तरेकडील खोली क्रमांक 4 येथे नव्याने मतदान केंद्र क्रमांक 73 उर्दू प्राथमिक शाळा खोली क्रमांक 1 पुर्वेकडील भाग येथे हिंदुस्थान कॉलनी व खोली क्रमांक 2 पश्चिमे कडील भाग नव्याने तयार करण्यात आले असून यामध्ये हिंदुस्थान कॉलनी, जोषी प्लॉट वार्ड न.1 येथील मतदाराचा समावेश आहे.
मतदान केंद्र क्रमांक 184 यशवंत कन्या शाळा देवळी येथील नविन इमारत खोली क्रमांक 2 येथे मतदान केंद्र क्रमांक 186 यामध्ये दिनशक्ती मज्जीत जवळील, मुंडे प्रिंटींग प्रेस जवळील, नगर परिषद ले आऊट मधील व मतदान केंद्र क्रमांक 187 तयार करण्यात आले असून यामध्ये नगर परिषद ले आऊट मधील, गोल्हर ले आऊट मधील म्हाडा कॉलनी मधील, गांधी चौक येथील व चिंतामणी कॉलनी येथील मतदारांचा समावेश आहे.
मतदान केंद्र क्रमांक 188 जनता प्राथमिक शाळा देवळी उत्तरेकडील खोली येथे मतदान केंद्र क्रमांक 191 तयार करण्यात आले असून यामध्ये देशमुखपुरा, खोपाळपुरा, मिरणनाथ मंदिर यात्रा पंटागण येथील मतदाराचा समावेश आहे. मतदान केंद्र क्रमांक 192 जनता प्राथमिक शाळा देवळी येथे मिरणनाथ मंदिर यात्रा पंटागण व इंदिरानगर येथील मतदाराचा समावेश आहे.
मतदारांनी आपले नाव व्होटर हेल्पलाईन ॲप व व्होटर सर्व्हीस पोर्टल या ॲपवर तपासून घ्यावे, असे मतदान नोंदणी अधिकारी प्रियंका पवार यांनी कळविले आहे.