पक्षत्याग करतांना डोंगरे दांपत्य झाले भावुक.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना हिंगणघाट येथे भारतीय जनता पक्षाला जोरदार झटका बसला आहे. मागील 10 वर्षा पासून भारतीय जनता पक्षात असलेले सुनील डोंगरे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे यांनी रविवार दि 20 ऑक्टोबरला महावीर भवन येथे मेळावा घेऊन मागील 10 वर्षात पक्षाचे निष्टेने काम करूनही आमच्या आत्मसन्मानाला व स्वाभिमानाला ठेचं पोहचविल्याची खंत आपल्याला भाषणातून व्यक्त केली. यावेळी दोघांनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.
मागील अनेक महिन्यांपासून हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे असे चित्र दिसून येते आहे. त्यामुळे आमदार समीर कुणावर यांच्यावर पक्षातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहे. त्यामुळे सुनील डोंगरे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे यांनी भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून सुनील डोंगरे यांनी आमदार समीर कुणावर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पक्षात सुरू असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता.
यावेळी बोलतांना सुनील डोंगरे यांनी मागील दहा वर्षात भाजपा साठी निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची माहिती दिली. परंतु मागील वर्षेभरात पक्षात आलेल्या नव्या लोकांना पदे देऊन आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सतत डावलण्यात आले. सातत्याने विकासाचे राजकारण करीत आम्ही पक्षाच्या ध्येयधोरणा सोबत काम करीत होतो परंतु आमच्या प्रामाणिक पणाची दखल घेण्याची गरज भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला कधीच वाटली नाही. सतत उपेक्षा करण्यात येत असल्याने आम्ही पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय अतिशय दुःखी अंतःकरणाने घेत असल्याचे सांगत असतांना माजी नगरसेविका शुभांगी व भाजपाचे माजी जिल्हा चिटणीस सुनील डोंगरे यांना अश्रू अनावर झाले होते.
भाजपा सोडल्यानन्तर पुढील निर्णय काय घ्यायचा याबाबत त्यांनी सध्या तरी मौन बाळगले आहे. या मेळाव्याला बहूसंख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते.
डोंगरे दांपत्य पुढे काय निर्णय घेतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.