देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- अंशदाई पेंशन योजना (NPS) रद्द करून सर्वाना जुनी परिभाषीत पेंशन योजना (OPS) लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या हिंगणा तालुका पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवण्यात आले. अलिकडेच राजस्थान, छत्तीसगड, गोवा, या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचा-यांना अंशदाई पेंशन योजना (NPS) रद्द करून सर्वाना जुनी परिभाषीत पेंशन योजना (OPS) लागु केलेली आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी यांना अंशदाई पेंशन योजना (NPS) रद्द करून सर्वाना जुनी परिभाषीत पेंशन योजना (OPS) लागु करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अंतर्गत राज्य ग्रामसेवक युनियन चे तालुकाध्यक्ष सचिन वाटकर, सचिव राजेंद्र मुरले, जीवन कोल्हे, देवेंद्र खडसे, मनोज काटवे,संजय ढोरे, विस्तार अधिकारी निकम, किशोर अलोने, गुणवन्त चिमोटे, हरी आखरे, वनिता मेश्राम, अश्विनी अवसरे, पूनम पांडे, राजेंद्र देशमुख, सुधाकर थुल, अंबादास लोखंडे, एम एम खाडे, एम ए लांजेवार, किरण भुरे, ज्योती सातपुते, सुहासिनी कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.