उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण व सन्मान आदिशक्तीचा पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मधुकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी नाशिक) श्री कल्याणराव पाटील सल्लागार अध्यक्ष राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक श्री अरविंद सोनवणे सटाणा बागलाण अध्यक्ष राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था हर्षली भोसले मॉडेल व ॲक्टर व ब्रँड अंबेसीटर राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक रसिका नुपूर फॅशन डिझायनर श्रीमती डॉ. राखीताई मोरे (गुरुवर्य) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण माहितीपटाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था पंचवटी नाशिक संस्थापिका अध्यक्षा डॉ. चेतना सेवक, श्री लाला टक्कर अध्यक्ष, सौ जयश्री भटेवरा निफाड अध्यक्षा, श्रीमती राणी कासार उपाध्यक्ष, डॉ. संदीप काकड मखमलाबाद अध्यक्ष, जावेद शेख सचिव, श्री अरविंद सोनवणे बागलान सटाणा अध्यक्ष, गायत्री लचके महिला कार्यकारिणी अध्यक्ष, जयश्री डांगे संस्कृतिक अध्यक्ष, हर्षली भोसले बँड अम्बुसेटर, पत्रकार डॉ. शाम जाधव, डॉक्टर अशोक पगारे, विकी कुठे उपस्थित होते.
श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देश संस्था टिम जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपला उद्योग व्यवसायात यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यातील कर्तुत्ववान व्यक्तींचा त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर श्याम जाधव यांना सन्मानित करण्यात आले मधुकर कड सर( वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी नाशिक ) व सन्मान अधीक्षक तिचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजन करण्यात आले सन्मान आदिशक्तीचा पुरस्कार एकूण ८० महिलांना सामाजिक कार्यकर्ते कार्यरत असलेला सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एकूण २० पुरुषांना सन्मानित करण्यात आले हे सर्व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब हॉल खचाखच भरलेला होता महिला पुरुष यांची एकच गर्दी जमली होती अगदी आनंदीच्या वातावरणात हा पुरस्कार सोहळा वितरित करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री डव्हान व डॉ. अशोक पगारे व गायत्री लसके यांनी केले
निर्भीड ज्योत पोलीस टाईम संपादक डॉ. संदीप काकड, डॉ. शाम जाधव व डॉ. अशोक पगारे यांच्या टीमने अथक परिश्रम करून श्री राधिका बहुउद्देशीय संस्था पंचवटी नाशिक आपले योगदान लावले लोकसाक्ष न्यूज श्री सुरेश चव्हाण यांचे ही परिश्रम लाभले संस्थेचे आचार विचार हे समाजापुढे मांडणे हेच पत्रकारितेचे उद्देश होय . त्याच वेळी चैत्यानाची ज्योत डॉ चेतनाताई सेवक या माहिती पटाचे अनावरण झाले तसेच राधिका फाउंडेशन च्या निफाड शाखेच्या फलकाचे पण अनावरण करण्यात आले.