हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेस वर्चस्व होते. पण, गेल्या 20 वर्षात सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंगणघाट नगर परिषदची सत्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता, पंचायत समितीची सत्ता असो किंव्हा राजु तीमांडे यांना हिंगणघाट विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आणण्याची किमया सुधीर कोठारी यांनी 15 वर्षा अगोदर केली होती. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तन मन धनाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक गावात पोहचवली. त्यामुळेच सुधीर कोठारी हेच विद्यमान आमदार समीर कुणावर यांना टक्कर देऊ शकतात त्यामुळे सुधीर कोठारी यांनी अपक्ष उमेदवार दाखल केली असली तरी ती परत घेऊ नये अशी चर्चा संपूर्ण विधानसभा मतदार संघात सुरू आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनतेचे, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना 1 रुपयात भरपेट जेवण, शेतकऱ्यांना मुलांना मोफत लॅपटॉप, धान्याचे साठणुक करण्यासाठी गोदाम सह इतर अनेक लोक कल्याणकारी शेतकरी हिताच्या योजना राबवून राज्यात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबर वर नेणारे सभापती सुधीर कोठारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर कोठारी यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे होते अशी चर्चा संपूर्ण विधानसभा मतदार संघात सुरू आहे. ते जेष्ठ नेते असून उमेदवारीचे खरे दावेदार आहे. त्यांच्यामुळेच हिंगणघाट विधानसभा मतदार संघात विविध संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडा फडकला आहे. पण जेष्ठ नेत्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नवख्या अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. पण त्यांची उमेदवारी विद्यमान आमदार समीर कुणावर यांच्या पुढे कितपत टिकाव धरू शकेल हे वेळच सांगणार? पण, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात आमदार समीर कुणावर यांना सुधीर कोठारी हेच चांगली टक्कर देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या झेंडा हिंगणघाट विधानसभा मतदार संघात फडकावु शकतात अशी चर्चा सुरू आहे.
मागील 10 वर्षांपासून भाजपा आमदार समीर कुणावर यांनी आमदारकी भूषवली आहे. मात्र आजतागत नागरिकांचे मूलभूत मिल कामगार, मजूर, उच्च शिक्षण सह प्रश्न अजूनही सुटलेले नाही. त्यात हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहराच्या बाहेर गेल्याने आमदार समीर कुणावर यांच्यावर हिंगणघाट शहरातील नागरिक तीव्र नाराजी आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमदार समीर कुणावर यांना भोवणार असे चित्र दिसून येते आहे. त्यात इतर विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत हिंगणघाट विधानसभा मतदार संघात रोजगाराच्या संधी विकासाचा ठोस दृष्टीकोन बघायला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. त्यामुळे आतापर्यंतची सर्व परिस्थिती लक्षात घेत जनतेला सुधीर कोठारी यांचा पर्याय खुला आहे.
सुधीर कोठारी यांना जनतेचा पाठींबा..
जनतेने ठरविले तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार नेते असलेले सुधीर कोठारी यांना आमदार करण्याची संधी मिळू शकते. नागरिकांना आता तिसरा पर्याय योग्य वाटत असल्यामुळे अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांना जनतेचा पाठींबा मिळत आहे.
सुधीर कोठारी यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल सांगायचं झालंच तर, मागील तीन दशके राजकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गोर गरीब, कामगार, शेतकरी, सर्व सामान्य माणसाना न्याय मिळवून देण्यासाठी, रस्ते , स्वछता राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा जनतेशी दांडगा व तळागाळात जनसंपर्क आहे. उत्तम वक्तृत्व व संभाषण कौशल्य तडफदार उमेदवार म्हणून सुधीर कोठारी प्रभावी ठरतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.