पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी नागपूर विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. पण त्या अगोदर भव्य रॅली कडून भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. पण या रॅलीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौकातील पुतळ्याला भाजपा नेते अभिवादन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नारे लावण्या ऐवजी जय श्रीराम चे नारे लावण्यात आल्याची माहिती समोर आल्याने आंबेडकरी समाजात असतोष पसरला आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, डॉ. मिलिंद माने, जयदीप कवाडे, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे या तमाम मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना, बाबासाहेबांचे नारे लावण्याऐवजी जय श्रीराम चे नारे लावून आंबेडकरी समाजाचे भावना दुखावल्याबद्दल भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा दिक्षा भूमि बचाव संघर्ष समितिच्या वतीने जाहीर निषेध करून यांच्यावर गुन्हा दाखल् करण्यात यावा यासाठी तहसीलदार यांच्या मार्फत निवडणुक आयोग याना निवेदन देण्यात् आले.