🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट दि.२४ सेप्टेंबर:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. याच अनुसघाने शहरातील प्रत्येक प्रभागात नगर पालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविन्यात येत आहे.
स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील नगरसेवक राजू कामडी व सहकाऱ्यांनी आज दि.२४ रोजी प्रभागातील नंदोरी चौक ते भाकऱ्या नाला या मुख्य मार्गाची साफसफाई करीत स्वच्छता अभियान राबविले, या स्वच्छता अभियानात आ. समीरभाऊ कुणावार, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, भाजपा जिल्हा महामंत्री सुभाषजी कुंटेवार, भाजपा शहर अध्यक्ष आशीष परबत, माजी नगरसेवक राजू कामडी, माजी नगरसेविका वैशालीताई सुरकार, किशोर रोंघे, भाजपा शहर महामंत्री अनिल गहेरवार यांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
उपरोक्त स्वच्छता अभियानात रमेश सिर्सिकर,मधुकर बावणे,रामदास गेडेकर, डॉ.राजेश कोरडे, अनिल दारुणकर, पिंटू तेलहांडे, सहस्त्रबुधे काका, वाणी साहेब, नवनाथ टापरे, कमलेश वंजारी, प्रकाश काळे, आशीष बोबडे, अमोल राऊत, विलास अंबरवेले इत्यादिनी विशेष सहकार्य केले. यावेळी प्रभागातील नागरिक,पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

