मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटचे वतीने गुरुनानक जयंती निमित्त ब्लँकेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. आशापूर्ण बाबा, नानक राम दरबार, सिंधी कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल म्हणाले की दर दिवशी दिवस थंडीचा प्रकोप वाढत आहे .समाजात असे घटक आहेत की त्यांना थंडीपासून बचाव करण्याकरीता गरम कपड्यांची निकड भासते अशा घटकांना दिलासा देण्याकरीता मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने शहरातील इतर विविध भागात सुद्धा गरजू, निराधार, वृद्धांना मायेची ऊब मिळावी . याकरिता उबदार कपडे, ब्लॅंकेट, टोपी आदीचे वितरण करण्यात येईल असे सांगितले. या उपक्रमास हातभार लावल्याबद्दल त्यांनी देणगीदाते समाजसेवीचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता अशोक मिहानी, रूपचंद हेमनानी, पंकज हेमनानी, रामचंद्र दुब्बानी, राजू मोटवानी, प्रा. किरण वैद्य, विपिन खींवसरा, एड. विशाल जैन, दुर्गा प्रसाद यादव, नेताजी लाजूरकर, महेश मोटवानी, लक्ष्मण डाहके, यशवंत गढ़वार, लक्ष्मीकांत मेन्डे, किशोर बतरा, राजु पिसे, प्रकाश जोशी, रवि उदासी, विनोद उदासी, हरीश जेसवानी, विक्की तकतानी, कविता हेमनानी, अनुराधा मोटवानी, किरण अग्रवाल, वेदांशी हेमनानी, जया पाखरानी, किरण उदासी, सोनम उदासी, नेहा मोटवानी सह समस्त नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.