युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कामठी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. सातव्या फेरी अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना झटका बसला आहे. येथून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश भोयर यांनी 5966 मताने आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश भोयर यांना 35764 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 29798 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विक्रांत मेश्राम यांना 1722 मते मिळाली आहे.