युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. नवव्या फेरी अखेर काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनुजा सुनील केदार यांना झटका बसला आहे. येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी 11084 मताने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांना 41485 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार अनुजा सुनील केदार यांना 30401 मते मिळाली आहे. ते 11084 मताने पिछाडीवर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार ताराबाई गौरकर यांना 832 मते मिळाली आहे.

