मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समिर कुणावर यांनी एकतर्फी विजय मिळवत हैट्रिक साधली आहे. समीर कुणावर यांचा विजय झाल्यानंतर हिंगणघाट विधानसभा मतदार संघात मोठा जल्लोष त्यांच्या समर्थकांनी केला.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदार संघातील लढत चर्चेत होती. या ठिकाणी भाजपा ने विद्यमान आमदार समीर कुणावर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत झाली. त्यात समिर कुणावर यांनी हैट्रिक करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
46-हिंगणघाट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
सर्व फेरी अंती भाजप उमेदवार समीर कुणावार यांना 113904 मते मिळाली असून विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अतुल नामदेव वांदिले 83026 मते मिळाली आहे. भाजपा उमेदवार समीर कुणावार शेवटच्या फेरी अखेर 30878 मतांनी विजयी झाले आहे.
भाजपा कार्यकर्त्याकडून एकच जल्लोष:
हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपा उमेदवार समिर कुणावर यांचा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष कुणावर त्यांच्या समर्थकांनी केला.