मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात राज्याचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा चौरंगी लढतीत विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते.
धर्मरावबाबा आत्राम 16814 मतांनी विजयी: अहेरी विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 22 फेरीत मतमोजणी झाली त्यात सुरुवाती पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निर्णायक लीड मिळत होती. सर्व फेरीच्या अखेर धर्मराव बाबा आत्राम यांना 54206 मते मिळाली असून ते 16814 मतांनी विजयी झाले आहे. त्यात दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजे अंबरीशराव आत्राम यांना 37392 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांना 35765 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार हमंतू मडावी यांना 27188 मते मिळाली आहे.
राज्यात अहेरी मतदार संघातील लढत चर्चेत होती. या ठिकाणी बाप विरुद्ध मुलगी अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यानंतर बाप बाप होता है…अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.
धर्मराव आत्राम यांच्याकडून जल्लोष
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते.