श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- काल राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले. त्यात भाजपा महायुती ने जोरदार वापसी करत भगवा फडकवला आहे. त्यात बीड जिल्हातिल आष्टी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी विजयी होताच पंकजा मुंडेंवर टीकास्त्र डागले आहे. पंकजाताई तुम्ही मला धोका द्यायला नको होता. फोन करून लोकांना माझ्या विरोधात काम करायचे सांगितले. लोकसभेला मी प्रामाणिकपणे काम केले मात्र तुम्ही मला धोका दिला हे बरोबर नाही केले, अशा शब्दात सुरेश धस यांनी पंकजा मुंडेवर सडकून टीका केली.
सुरेश धस विजयी झाल्यानंतर त्यांनी आष्टी शहरात जल्लोषात विजयी मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीतून त्यांनी पंकजा मुंडेवर जोरदार टीका केली. पंकूताई तुम्ही लक्ष्मण हाकेंना गोंडस बाळ म्हणाले कुठून आणले हे गोंडस बाळ हाके इथे आष्टी आले आणि भीमराव धोंड्यांना निवडून आणा सुरेश धस पाडा असं सांगितलं यांना सुरेश धस यांना पाडण सोपं नाही.
माझ्या विरोधात लोक उभी करून षडयंत्र रचले गेले. मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी व त्यांचे अनंत गर्जे पीए संकेत सानप यांनी लोकांना गाडीत बसून फोन केले पंकजाताई बरोबर नाही असे म्हणत सुरेश धस यांनी विजयी होतात पंकजा मुंडे यांच्या वरती टीका केली आहे.