उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली येथे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी सकाळी दहा वाजता सर्वप्रथम आपले आदर्श महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा यांना धूप दीप पुष्प यांनी पूजन काकडे सर बोधिसत्व बोरखडे मामा, शेळके ताई यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी प्रास्ताविक केले आणि त्यानंतर सार्वजनिक त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी विहाराचे जेष्ठ सदस्य चंद्रकांत चौधरी यांनी पालीभाषा सर्वांना अवगत होणे आवश्यक आहे. तसेच पाली भाषेची ओळख त्यांनी थोडक्यात समजावून सांगितली. “नवांग सत्थु सासन,” म्हणजे त्रिपिटीक साहित्य नऊ अंगामध्ये विभक्त अथवा भाग आहेत. (एक) सूत: सूत्तामध्ये भगवान बुद्धांचे मोठ-मोठे उपदेश आहेत. ( दोन)गेय्य:- यामध्ये गाथा गद्य आणि पदयामध्ये संमिश्र संग्रह आहे. (तीन) वैय्याकरण:- प्रत्येक गोष्टींची साहित्यामध्ये असलेली व्याख्या स्पष्टीकरण याचा अंतर्भाव होतो. (चार) गाथा:- पद संग्रह,( पाच ) उदान:- भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेले सहज उदगार. ( सहा) इतिवुत्तक:- असे, असे म्हटले, अशा प्रकारचे भगवान बुद्धांनी दिलेल्या उपमांचा संग्रह. (सात) जातक:- भगवान बुद्धांच्या जीवनातील 547 पूर्व जन्माच्या कथा (आठ) अभ्युत धम्म:- योगिक रिद्धी सिद्धी वर्णनांचा संग्रह तशा प्रकारे लिहिण्याची पद्धत. (नऊ) व्यदल:- प्रश्न आणि उत्तर यांचा संग्रह.
तथागतांची पाली भाषा म्हणजे, पाली भाषा ही बुद्ध वचनांची भाषा आहे. सिंहली परंपरेनुसार पालीची मूळ भाषा मागधी होय. मध्यकालीन भारतीय आर्यभाषा युगात जन भाषा युगाचे चार स्तर आहेत. भगवान बुद्धांचा उपदेश मौखिक स्वरूपात होता. पाली भाषेचे उगमस्थान विंध्य प्रदेश आहे. कारण गिरनार शिलालेखांशी पाली भाषेचे अधिक साम्य आहे. अशोकाच्या भागृ शिलालेखात कोणत्या शब्दांचा आढळून येतो “पालीयन” -“धम्म उपदेश” पाली भाषा ही सभ्य समाजात बोलली जाणारी प्रतिष्ठित स्वरूपाची भाषा होती. , सभ्य समाजाची सामान्य बोलीभाषा होती. पाली भाषेची नऊ अंगे आपणास यापूर्वी सांगितलेली आहेत. मूळ बुद्ध वचन पटीपती, परियाती, पटीवेदन या तीन मध्ये अंतर्भाव होतो.
पठटीपत्ती म्हणजे बुद्ध वचनांच्या अभ्यासाच्या आधारे व्यक्तीने धम्माच्या केलेल्या आचरणांना पटीपत्ती असे म्हणतात. परियती म्हणजे त्रिपीटकातील मूळ बुद्ध वचन अर्थात त्रिपीटक साहित्यास परियती म्हणतात. पटीवेदन: आचरणानुसार इच्छित फळांच्या प्राप्तीचा अनुभव घेणे म्हणजे पटीवेदन होय. पाली भाषेचा विकास सर्वप्रथम भगवान बुद्धाने लोकांना धम्म सांगण्याकरिता तथाकथीत प्राकृत जन बोलीचा उपयोग वापर केला. बुद्ध महापरिनिर्वाणा नंतर बुद्धासोबत असलेले भिकू, ज्यांनी बुद्धांचे प्रवचन 45 वर्षे सतत ऐकलेले होते व मुखोगत तोंड पाठ मौखिक केलेले होते.
पाली भाषेच्या विकासाचा प्रथम टप्पा / भाग होय. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अर्थात इसवीसन पूर्व 483 ते इसवीसन पूर्व 29 अशा पाचशे वर्षे या काळात बुद्धांचे प्रवचन भरलेल्या धम्म संगीतिच्या माध्यमातून बौद्ध वचन लोकांमध्ये प्रवाहित/ प्रसारित केलेले आहे. यामध्ये एकूण सहा जागतिक स्तरावर धम्म संगीती यांचे आयोजन झालेले आहे. धम्म संगितीच्या अभ्यास नंतर कऱुन सविस्तर सांगता येईल. चौथ्या धमसंगतीमध्ये अर्थात इसवी सन पूर्व 29 ही धम्मसंगती राजा “वटगामीनी” अभय यांच्या राज आश्रयाने ती धम्मसंगती भरविली गेली होती. याच धम्म संगतीमध्ये संपूर्ण त्रिपिटक ताडपत्रावर प्रत्यक्षात लिहिले गेले, तेव्हापासून मौखिक असलेली बुद्ध वचने लेखणी बद्द झालेली आहेत.
अठृकथाचार्य बुद्धघोष महास्तवीर इसवी सन चौथे पाचवे शतक यांनी प्राचीन जल बोलीला प्राप्त झालेले होते. त्यांनी मूळ त्रिपिटकास पाली भाषा म्हणून संबोधलेले आहे. म्हणून पाली भाषा म्हणजे भगवान बुद्ध यांच्या वचनांची भाषा झालेली आहे. पुढे इसवी सन बाराव्या शतकापासून पाली भाषेवर व्याकरणा सहित साहित्य निर्माण झाले. अशा प्रकारे मौखिक बुद्ध वचने प्राकृत बोलीला मागधी छाप मिळते. त्यानंतर त्रिपीटक लेखणी बद्द अशोक यांचे शिलालेख साहित्य अठ्ठकथा साहित्य, पाली ज्याला अनुभूती साहित्य म्हणतात. पिटकेतर साहित्य असल्याचे काव्यग्रंथ पाली व्याकरण साहित्य अशा प्रकारे पाली भाषेचा विकास आज पर्यंत होत आहे.
पालीभाषा व संस्कृत भाषा सहसंबंध:- मूळ रूपाने कोणतीही बोली ही प्राकृत स्वरूपातच असते. ज्या वेळेला मूळ स्वर आणि व्यंजन तसेच शब्द यांच्यावर संस्कार करून निर्माण झालेल्या भाषेला संस्कृत भाषा म्हणतात या आधारे तुलना केली तर पाली भाषेचे स्वर आणि व्यंजन यांची संख्या संस्कृत भाषेत वापरतात. त्या स्वर व व्यंजन यांनी तुलना केली तर पाली भाषेतील स्वर आणि व्यंजन हे संस्कृत भाषेतील स्वर आणि व्यंजने संख्येने कमी आहेत. यावरून पाली भाषा ही प्राचीन भाषा आहे आणि संस्कृत भाषा ही त्यानंतरची आहे हे स्पष्ट होते. जेव्हा सहसंबंध स्पष्टीकरण करीत असताना या दोन्ही भाषा समांतर मानाव्या लागतील कारण जे साहित्य लिहिण्यासाठी ज्या लिपीचा वापर केला गेला त्या लिपीला पाली साहित्यिकारांनी धम्म लिपी असे म्हटलेले आहे. त्याच धम्म लीपीला संस्कृत साहित्यिकांनी ब्राह्मी लिपी असे म्हटलेले आहे.
सम्राट अशोकाच्या काळात पाली साहित्याच्या लिपीला धम्म लिपी म्हटलेले आहे. आज या लिपीला नागरी लिपी किंवा देऊन नागरी लिपी म्हणतात. ही लिपी इसवी सन पूर्व काळात दिसत नाही. व्याकरणाच्या दृष्टीने पतंजली संस्कृत व्याकरण हे पाली व्याकरणापूर्वी जरी दिसत असले तरी व्याकरण तेव्हा शिकवले जाते तेव्हा ती दुसऱ्यांना शिकवावयाची असते. परंतु पाली भाषेचा विचार केला तर फार मोठा विस्तृत समाज व विस्तृत प्रदेश पाली भाषेला चांगल्या रीतीने जाणत होता आणि मानत होता. त्यामुळे पाली साहित्यिकांना व्याकरण ग्रंथाची आवश्यकता भासली नाही. तरीही तेव्हा सुद्धा पाली व्याकरण साहित्याची परंपरा फार विस्तृत आहे. व सर्व पाली व्याकरण साहित्य अभ्यासाला उपलब्ध आहे. शेवटी हेच म्हणावे लागेल की, पाली भाषा ही बुद्ध वचने आहेत. तर संस्कृत भाषा ही वैदिकांची ब्राह्मण वचने आहेत, दोन्ही भाषा प्राचीन भारतीय धर्मांना स्पष्ट करणाऱ्या भाषा आहेत. अशाप्रकारे माहिती देऊन त्यांनी त्यांच्या धम्म देसनेस पूर्णविराम दिला.
यावेळी डॉ. सुधीर घोलप यांनी सर्व उपस्थित त्यांचे आभार मानून त्याचप्रमाणे शिलरत्न काकडे यांनी आपल्या लहान बालकांनाही घेऊन आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करून धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.