राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एका गुजराती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ताने महाराष्ट्र राज्याचा मराठी मुली आणि नागरिकांचा अपमान केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका भाजपच्या गुजरातमधील कार्यकर्त्याने मराठी आणि महाराष्ट्र आणि मराठी मुली, महिलाबदल सोशल मीडियावर गरळ ओकली आहे. त्यात मराठी लोकाबाबत अश्लील भाषा वापरण्यात आली आहे. सोहिल अश्विन शाह असे या व्यक्तीचे नाव आहे.
काय म्हणाला गुजराती सोहिल अश्विन शाह : मराठी लोक हरामी आहेत. महाराष्ट्राला गुजरात्यांनी घडवलेय, मराठी लोक तर मजूर आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला गुजराती लोकांनी भिकेत दिलाय, अशी गरळ गुजरातमधल्या सोहिल अश्विन शाह याने समाज माध्यमांवर ओकली. त्यानंतर शाहविरोधात वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई में बीजेपी का राज आया है.. अब मराठी नहीं मारवाडी में बोलने का.. अशी मुजोरी मुंबईच्या गिरगावातील एका व्यापाऱ्याने विमल म्हसकर यांच्याकडे केल्याची घटना ताजी असतानाच समाजमाध्यमावरून गुजरातमधील सोहिल अश्विन शाह याने मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा घोर अवमान केला आहे. याविरोधात वागळे इस्टेटच्या ज्ञानेश्वरनगरातील रहिवासी अशोक जाधव यांनी थेट वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून सोहिल अश्विन शाह याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शाहची गरळ: महाराष्ट्र बनाया है गुजरातीयोने, मराठी लोग तो लेबर है. तुम्हारे महाराष्ट्र में एक बस मुंबई ही है जिस के दम पे तुम उड रहे हो. वोह भी हम गुज्जू ने तुम्हे भीक में दी थी… हरामी साले.