पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे स्कूलव्हॅन चालक गेल्या 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता. त्याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत 11 वीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकवत अनेक वेळा शारीरिक संबंध बनवले. परंतु त्रास असाह्य झाल्यामुळे तिने याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितल्याने या संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पिढीत मुलगी आणि नातलग पोलिसात जाऊन सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी नागपूर शहर अजनी पोलिसांनी नराधम आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन स्कूलव्हॅन चालकाला बेड्या ठोकल्या असून गिरीश रामटके वय 60 वर्ष असे नराधम आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) ही तरुणी नागपूर शहरातील एका नामांकित शाळेत 11 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्याच वस्तीत राहणारा नराधम आरोपी गिरीश रामटके हा अविवाहित असून आपल्या वृद्ध आईसोबत राहतो. त्याने आईला सांभाळायला केअरटेकर महिला ठेवली आहे. सोनमच्या वडिलाशी आरोपी गिरीशची मैत्री आहे. त्यामुळे तो नेहमी घरी येत जात होता.
आरोपी गिरीश हा सोनम तो नेहमी लाड करायचा. तिला नेहमी खायला चॉकलेट किंवा खाऊ आणत होता. त्यामुळे सोनमसुद्धा त्याच्याशी बोलत होती. तिला तो अनेकदा शाळेत सोडून देत होता. मात्र, गिरीशची वाईट नजर सोनमवर होती. त्यामुळे तो नेहमी तिला बघायला घरी येत होती. १ मे २०२४ ला तो सोनमच्या घरी आला. त्यावेळी तिच्या घरी कुणी नव्हते. त्यामुळे त्याने सोनमला चॉकलेट दिले आणि अश्लील चाळे केले. गिरीशचे कृत्य बघून ती घाबरली. तिने लगेच हाताला झटका देऊन घराबाहेर पळ काढला.
त्याने तिची समजूत घालून कुणालाही प्रकार न सांगण्याचा दम दिला. काही दिवसांनंतर तो परत सोनमच्या घरी आला. त्याने घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत बळजबरीने सोनमवर बलात्कार केला. त्यामुळे सोनम पूर्णत घाबरली आणि रडायला लागली. त्यामुळे त्याने तिला आई-वडिलांची हत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे सोनम पूर्ण घाबरून गेली. तिने बलात्काराची घटना कुणालाही सांगितली नाही. त्यामुळे तो वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत होता.
बलात्कारानंतर मुलीच्या वागणुकीत बदल: नराधम आरोपी गिरीशने सोनमवर केलेल्या बलात्कारा नंतर तिच्या वागणुकीत बदल झाला. मात्र, आई वडिलांच्या तो लक्षात आला नाही. गिरीशचा वाढता अत्याचार तिला सहन होत नव्हता. तब्बल 6 महिने ती गिरीशचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. गिरीश घरी आल्यानंतर ती घाबरायला लागायची. शेवटी आईने तिची आस्थेने विचारपूस केली. ती रडायला लागली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. त्याने लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्याला 1 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.